fifa world cup 2022 Argentinian tv reporter dominique metzger robbed during live show at fifa world cup 2022 in Qatar  
क्रीडा

FIFA World Cup 2022: कतारमध्ये वर्ल्डकप कव्हर करायला गेलेल्या पत्रकारालाच लुटले! VIDEO होतोय व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

कतारमध्ये होत असलेल्या फुटबॉल विश्वचषक अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. यादरम्यान आता एका टिव्ही रिपोर्टचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. कतारमध्ये फुटबॉल विश्वचषक 2022 च्या उद्घाटन सामन्याच्या वृत्तांकनादरम्यान अर्जेंटिनाच्या पत्रकाराच्या बॅगेतून काही वस्तू चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर पत्रकाराने याबाबत तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले तेव्हा कतार पोलिसांची प्रतिक्रिया देखील आश्चर्यकारक होती.

चोरी झाली तेव्हा ही महिला रिपोर्टर लाईव्ह होती आणि या लाइव्ह कव्हरेजचे फुटेजही सोशल मीडियावर व्हायरल झाले पत्रकार डॉमिनिक मेट्झगर यांनी यूके मिररला सांगितले की जेव्हा ती चोरीची तक्रार करण्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये गेली तेव्हा तिला विचारण्यात आले की चोराला कोणती शिक्षा भोगावी लागेल. आमच्याकडे हायटेक कॅमेरे असून आम्ही चोराला पकडू. तिला कोणती शिक्षा हवी आहे? चोराला पाच वर्षे शिक्षा करायची की देशाबाहेर काढायचे? असे पोलिसांनी रिपोर्टला विचारले.

कतारमध्ये वार्तांकन करताना अनेक पत्रकारांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. याआधी एका डॅनिश पत्रकाराला त्याच्या चॅनलसाठी चित्रीकरण करताना थांबवण्यात आलं होतं. स्पर्धेच्या आयोजकांनी नंतर रिपोर्टरची माफी मागितली आणि कबूल केले की रिपोर्टरला चुकून रोखण्यात आलं होतं.

दरम्यान कतारमध्ये 20 नोव्हेंबरपासून FIFA विश्वचषक 2022 सुरू झाला आहे, ज्यामध्ये पहिला सामना यजमान कतारसोबत इक्वाडोरसोबत झाला होता. या सामन्यात कतारचा 2-0 असा पराभव झाला. यावेळी फिफा विश्वचषक 28 दिवस चालणार असून यामध्ये एकूण 64 सामने खेळवले जाणार असून 32 देश यात सहभागी होणार आहेत. या विश्वचषकाचा अंतिम सामना १३ डिसेंबरला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Sugar Factory : भोगावती साखर कारखान्याचा विक्रमी ऊस दर; राज्यातील सर्वाधिक दर देणारा कारखाना ठरला

IND vs AUS 4th T20I: शुभमन गिलची 'जागा' वाचवण्यासाठी संथ खेळी! सूर्यकुमार यादव पुन्हा अपयशी, ऑस्ट्रेलियाने आवळला फास...

Latest Marathi Live Update News : पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

'हा' मराठी अभिनेता उतरला निवडणुकीच्या रिंगणात? लढवणार नगरपालिकेची निवडणूक; पोस्टर शेअर करत दिली हिंट

Raj Thackeray : इथे कशाला टाईमपास करतोस? राज ठाकरेंनी पिट्याभाईला झापलं, मनसेच्या पुण्यातील बैठकीची Inside Story

SCROLL FOR NEXT