FIFA World Cup 2022 Group H South Korea Vs Uruguay Match
FIFA World Cup 2022 Group H South Korea Vs Uruguay Match Esakal
क्रीडा

FIFA World Cup 2022 : अनुभवी उरूग्वेला दक्षिण कोरियाचा बचाव भेदण्यात अपयश; सामना गोलशून्य बरोबरीत

अनिरुद्ध संकपाळ

FIFA World Cup 2022 South Korea Vs Uruguay : फिफा वर्ल्डकप 2022 मधील ग्रुप H चा उरूग्वे विरूद्ध दक्षिण कोरिया सामना गोल शुन्य बरोबरीत सुटला. दोन्ही संघाला दोन्ही हाफमध्ये एकही गोल करता आला नाही. दोन्ही संघांना गोल करण्याचा चांगल्या संधी मिळाल्या होत्या. मात्र या संधीचे गोलमध्ये रूपांतर करणे जमले नाही. उरूग्वेसारख्या तगड्या संघाला दक्षिण कोरियाचा बचाव शेवटपर्यंत भेदता आला नाही. याचे नैराश्य खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

First Half : उरूग्वेने संधी दवडली

फिफा वर्ल्डकप 2022 ग्रुप H मधील दक्षिण कोरिया विरूद्ध उरूग्वे सामन्यात पहिला हाफ गोल शुन्य बरोबरीत राहिला. तुलनेने बलाढ्य असलेल्या उरूग्वेने दक्षिण कोरियाच्या गोलपोस्टवर आक्रमक चढाया करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना गोल मात्र करता आला नाही. दोन्ही संघांनी पासिंग आणि बॉल पजेशनमध्ये तुल्यबळ खेळ केला. मात्र अनुभवी उरूग्वेला दक्षिण कोरियाचा बचाव भेदण्यात यश आले नाही. दुसरीकडे दक्षिण कोरियाने देखील गोल करण्याच्या नामी संधी दवडल्या.

Second Half : उरूग्वेचे आक्रमण कोरियाने थोपवले

दुसऱ्या हाफमध्ये अनुभवी उरूग्वेने आपली आक्रमणाची धार वाढवत दक्षिण कोरियाचा चांगला बचाव भेदण्याचा प्रयत्न केला. मात्र फिनिशिंग अभावी त्यांना हा बचाव भेदता आला नाही. संपूर्ण सामन्यात सर्वात जास्त आक्रमण उरूग्वेने केले. मात्र त्यांना 10 शॉट्सपैकी एकच शॉट त्यांचा ऑन टार्गेट होता. दरम्यान, दुसऱ्या हाफची वेळ संपू लागल्यानंतर उरूग्वेने दबावात अनेक चाली रचल्या. शेवटच्या मिनिटापर्यंत दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र सफाईदार खेळाच्या अभावामुळे शॉट्स गोलपोस्टच्या बाहेर किंवा गोलपोस्टला लागून बाहेर गेले. अखेर सामना गोल शून्य बरोबरीत राहिला.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठा मदतनीसाला राजस्थानमधून अटक

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Sachin Tendulkar: सचिनच्या घरातून सिमेंट मिक्सरचा आवाज, शेजाऱ्याच्या तक्रारीनंतर आला फोन कॉल; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT