Women Cricket Team Sakal
क्रीडा

क्रिकेट जगतात होणार अनोखी लीग; भारतीय महिला मात्र मुकणार

सकाळ डिजिटल टीम

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या क्रिकेट लीगमध्ये 35 देशातील खेळाडू सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे ही लीग स्पर्धात पुरुषांची नसून ती महिलांची असणार आहे. ही ऐतिहासिक फ्रेंचायझी लीग दुबईच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. यात भारतीय महिला खेळाडूंचा मात्र सहभाग असणार नाही. दुबईमध्ये 1 मे पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. लैंगिक समानता मोहिमेत आघाडीवर असलेल्या फेयरब्रेकच्या पुढाकाराने होणाऱ्या स्पर्धेत 15 दिवसात 19 सामने खेळवण्यात येणार आहेत.

भारतीय संघाची स्टार खेळाडू हरमनप्रीत कौर, जेमिमा रोड्रिग्ज आणि दीप्ति शर्मा यासारख्या भारतीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार होत्या. पण बीसीसीआय (BCCI) ने सीनियर महिला राष्ट्रीय टी-20 स्पर्धा याच कालावधीत असल्यामुळे भारतीय खेळाडूंना एनओसी (NOC) देण्यास नकार दिल्याचे समजते. ही स्पर्धा दुबईच्या मैदानात होणार असली तरी याचे यजमानपद हे हाँकाँगकडे असेल. कोरोनाच्या नियमालीमुळे ही स्पर्धा दुबईला स्थलांतरित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत करारबद्ध झालेल्या 90 खेळाडूंमध्ये 40 खेळाडू हे पूर्णवेळ सदस्य असलेल्या देशांचे आहेत. न्यूझीलंड संघाची कर्णधार सोफी डिवाइन, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार सुने लुस, वेस्टइंडीजची अष्टपैलू डिएंड्रा डॉटिन आणि कीवी स्टार बॅटर सुजी बेट्स यासारख्या दिग्गज महिला खेळाडू स्पर्धेत सहभाग घेणार आहेत.

स्पर्धेत सहभागी 90 खेळाडूंना सहा संघात विभागण्यात येईल. कोणत्या संघाकडून कोण खेळणार याची यादी अद्याप समोर आलेली नाही. लवकरच ही माहिती जाहीर केली जाईल. वेस्टइंडीजची कर्णधार स्टेफनी टेलर टॉर्नेडोज या संघाचे नेतृत्व करणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

Latest Marathi News Updates : ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

SCROLL FOR NEXT