Diego Maradona Pele esakal
क्रीडा

VIDEO : आख्या जगानं प्रथमच पाहिलं मॅराडोना-पेलेंना TV सेटवर फुटबॉल खेळताना; 'हेडर'नं जिंकलं चाहत्यांचं मन

जगातील महान फुटबॉलपटू ब्राझीलचे पेले आता आपल्यात राहिले नाहीयेत.

सकाळ डिजिटल टीम

जगातील महान फुटबॉलपटू ब्राझीलचे पेले आता आपल्यात राहिले नाहीयेत.

जगातील महान फुटबॉलपटू ब्राझीलचे पेले आता आपल्यात राहिले नाहीयेत. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 29 डिसेंबर (गुरुवार) रोजी ब्राझीलमधील साओ पाउलो येथील रुग्णालयात त्यांचं निधन झालं. पेले यांच्या निधनानंतर जगभरातील फुटबॉल चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिलीये.

यादरम्यान त्यांचे जुने व्हिडिओ आणि मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पेलेंचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यामध्ये पेले अर्जेंटिनाचा दिग्गज डिएगो मॅराडोनासोबत फुटबॉल खेळताना दिसत आहे.

वास्तविक, डिएगो मॅराडोना आणि पेले एका टीव्ही शोमध्ये उपस्थित होते. मॅराडोनानं पेलेला फुटबॉल खेळण्याची विनंती केली. तो म्हणाला, आम्ही मैदानावर समोरासमोर कधीच भेटला नाही, पण टीव्ही सेटवर एकत्र खेळण्याची इच्छा आहे. यानंतर पेले मॅराडोनाला नकार देऊ शकला नाही. मॅराडोना म्हणाला, आम्ही फक्त आमच्या डोक्यानं चेंडू मारु. फुटबॉलच्या भाषेत त्याला 'हेडर' असं म्हणतात.

हेडरनं प्रेक्षकांचं जिंकलं मन

मॅराडोना आणि पेले खेळण्यासाठी तयार झाले, तेव्हा शोमध्ये उपस्थित असलेले प्रेक्षक रोमांचित झाले. कारण, त्यांना जगातील दोन महान फुटबॉलपटू खेळताना पाहण्याची संधी मिळाली. पेलेनंही मॅराडोनाच्या हेडरचं कौतुक केलं. हेडर-हेडर खेळल्यानंतर दोन्ही दिग्गजांनी एकमेकांना मिठी मारली. हा जुना व्हिडिओ फुटबॉल चाहत्यांना खूप आवडला होता. आता तो अजूनही शेअर केला जात आहे.

पेले-मॅराडोना चांगले दोस्त

जगभरातील चाहते पेले-मॅराडोना यांची तुलना करत असले तरी, दोन्ही खेळाडूंनी एकमेकांबद्दल कधीही सारखं बोललं नाही. पेले आणि मॅराडोना नेहमीच एकमेकांचं कौतुक करायचे. पेले यांचा एक मेसेजही व्हायरल होत आहे. मॅराडोनाच्या मृत्यूनंतर त्यानं इन्स्टाग्रामवर लिहिलं की, 'मॅराडोनासोबत मी आकाशात फुटबॉल खेळणार आहे.'

पेलेंचे ब्राझीलसाठी 77 गोल

मिनास गेराइस या ब्राझिलियन राज्यात जन्मलेला दिग्गज फुटबॉलपटू अजूनही सेलेकाओसाठी (ब्राझील) सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. त्यानं 92 सामन्यांत 77 गोल केले. एक व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून पेलेनं एकूण तीन वेळा (1958, 1962, 1970) फिफा विश्वचषक जिंकला, जो अजूनही वैयक्तिक फुटबॉलपटूसाठी एक विक्रम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांचा शेवटचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला; 'बेवारस'चं पोस्टर समोर, काय आहे कथा?

Reels पाहून कपल्स पोहोचलं सुप्रीम कोर्टात; वाटलं लग्न होईल, पण घडले भलतंच...

Nashik News : नाशिककरांनो लक्ष द्या! रमजान ईदनिमित्त उद्या वाहतुकीत मोठे बदल; 'या' मार्गांवर असेल प्रवेशबंदी

Ashok Kharat: कोट्यवधींची जमीन, आलिशान बंगला, फार्महाऊस… अशोक खरात १५ वर्षांत कसा बनला २०० कोटींचा मालक? कुंडली आली समोर

SCROLL FOR NEXT