Bapu-Nadkarni 
क्रीडा

दु:खद बातमी : 'मेडन ओव्हर'चे बादशहा बापू नाडकर्णी काळाच्या पडद्याआड!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जुन्या जमान्यातील कसोटीपटू आणि निर्धाव षटकांचे विक्रमवीर बापू नाडकर्णी (वय 87) यांचे शुक्रवारी (ता.17) मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. उद्या (शनिवारी, ता.18) शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

नाशिकमध्ये जन्मलेल्या बापू नाडकर्णी यांचे पूर्ण नाव रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी असे होते. डावखुरे फिरकी गोलंदाज आणि भरवशाचे फलंदाज असा त्यांनी लौकिक मिळवला होता. 41 कसोटी सामन्यात त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यात 88 विकेटस्‌ त्यांनी मिळवल्या होत्या. तसेच एका शतकासह 1414 धावाही त्यांनी केल्या होत्या.

1955-56 मध्ये दिल्लीतील फिरोजशा कोटला मैदानावर त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. विकेट आणि धावांपेक्षा निर्धाव षटके टाकणारे गोलंदाज म्हणून बापू नाडकर्णी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रसिद्ध होते. 29 षटकातील सलग 21 आणि एकूण 26 षटके त्यांनी निर्धाव टाकली होती.

त्यात एकही विकेट मिळाली नसला तरी अवघ्या पाचच धावा दिलेल्या होत्या. 32-27-5-0 असे त्यांचे पृथःकरण होते. त्यांचा हा विक्रम आजही अबाधित आहे. 12 जानेवारी 1964 रोजी इंग्लंडविरुद्ध मद्रास (आत्ताचे चेन्नई) येथील कसोटी सामन्यात बापू यांनी हा विक्रम केला होता. 

रणजी क्रिकेटमध्ये बापू नाडकर्णी यांनी सुरुवातीला 1951-52 ते 1959-60 या कालावधीत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर 1967-68 पर्यंत ते मुंबईकडून खेळले. सौराष्ट्रविरुद्धच्या एका सामन्यात त्यांनी नाबाद 201 आणि 17 धावांत सहा बळी अशी अष्टपैलू कामगिरी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

Latest Marathi News Live Update : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी फलटण पोलीस ठाण्याबाहेर सुषमा अंधारेंकडून ठिय्या

मित्रांसोबत दारू प्यायला जाताय? मग पुष्कर श्रोत्रीने सांगितलेले 'हे' चार नियम नक्की पाळा, म्हणतो- माझे वडील म्हणाले...

Supreme Court : 'महाकाल मंदिरासाठी आमची 200 वर्षे जुनी मशीद पाडली'; मुस्लिम पक्षाची सर्वोच्च न्यायालयात धाव, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT