AUS Vs ENG Ashes esakal
क्रीडा

ॲशेस मालिका इंग्लंड 5-0 ने हरेल; Australian फिरकीपटूचं भाकीत

सकाळ डिजिटल टीम

अॅशेस मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलियानं पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतलीय.

AUS Vs ENG, Ashes : अॅशेस मालिकेतील (Ashes Test) पहिले दोन कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलियानं (Australia) पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतलीय. अॅडलेड कसोटीच्या (Adelaide Test Match) पाचव्या दिवशी सोमवारी इंग्लंडचा (England) डाव 192 धावांवर आटोपून, ऑस्ट्रेलियानं 275 धावांनी मोठा विजय मिळवलाय. संघाच्या या कामगिरीनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगनं (Brad Hogg) जो रूटच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ 5-0 नं अॅशेस मालिका हरेल, असा अंदाज त्यानं व्यक्त केलाय.

ब्रॅड हॉगनं त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितलं, की ऑस्ट्रेलिया ही मालिका 5-0 नं जिंकेल, कारण इंग्लंडचा संघ फारसा लयीत दिसत नाहीय. जो रूटनं जे (Joe Root) सांगितलंय, त्यामुळं गोलंदाजांची नक्कीच निराशा होईल. रूट आणि ख्रिस सिल्व्हरवूड या दोघांनी संघाला विजयाच्या दिशेनं घेऊन जाणं गरजेचं आहे. पुढं जाण्यासाठी काय करावं लागेल, यासाठी त्यांनी प्रयत्न करणं आवश्यक असल्याचंही त्यानं सांगितलं.

पराभवानंतर रूटनं घेतला गोलंदाजांचा 'क्लास'

अॅडलेड कसोटीतील दारूण पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं संघाचा चांगलाच क्लास घेतला. आपल्या गोलंदाजांचा समाचार घेताना रूट म्हणाला, गोलंदाजांनी योग्य गोलंदाजी केली नाही. शिवाय, आपल्याला चेंडू कुठं टाकायचा आहे, हे गोलंदाजांना कळायला हवं होतं. मात्र, ते त्यांनी समजून घेतलं नाही. हे खूपच निराशाजनक नुकसान आहे, कारण आपण त्याच चुका पुन्हा-पुन्हा करत आहोत, असं त्यानं गोलंदाजांना सुनावलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT