Anastasia Pavlyuchenkova AND Barbora Krejcikova
Anastasia Pavlyuchenkova AND Barbora Krejcikova  Instagram
क्रीडा

French Open 2021 : यंदा नवी सम्राज्ञी मिळणार!

सुशांत जाधव

French Open 2021 : यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेत महिला गटातून नवी सम्राज्ञी मिळणार आहे. रशियाची बिगरमानांकित अ‍ॅनास्तासिया पाव्हल्यूचेन्कोव्हा आणि चेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेझिकोव्हा यांच्यात शनिवारी फायनल रंगणार आहे. पाव्हल्यूचेन्कोव्हा ही रशियाची चौथी खेळाडू आहे जिने फ्रेंच ओपनची फायनल गाठलीये. यापूर्वी अनास्तासिया मायकिना (2004), स्वेतलाना कुझनेत्सोवा (2009) आणि Maria Sharapova (2012 and 2014) यांनी फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. फायनलमध्ये दमदार कामगिरी करत पाव्हल्यूचेन्कोव्हा या यादीत आपले नाव नोंदवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरले. 10 वर्षांत 52 प्रयत्नानंतर पाव्हल्यूचेन्कोव्हा ग्रँडस्लॅमची फायनल खेळणार आहे.

दुसरीकडे चेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेझिकोव्हाही ऐतिहासिक कामगिरी करुन लक्षवेधण्यासाठी उत्सुक असेल. ती चेक प्रजासत्ताकची दुसरी खेळाडू आहे जिने ग्रँडस्लॅमची फायनल गाठलीये. चेक प्रजासत्ताकच्या हाना मंडलिकिको या दिग्गज महिला खेळाडूने 1981 मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. या ग्रँडस्लॅमशिवाय 1980 आणि 1987 मध्ये हाना मंडलिकिको यांनी ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकली होती.

बार्बोरा क्रेझिकोव्हा हिने सेमीफायनलमध्ये 3 तास 18 मिनिटे चाललेल्या मॅरेथॉन लढतीत टेनिस जगतातील 17 व्या मानांकित सक्कारियाचा मोठा अडथळा पार करुन फायनलमध्ये धडक मारलीये. तर दुसरीकडे अ‍ॅनास्तासियाने 85 व्या क्रमांकावर असलेल्या तमाराला 1 तास 34 मिनिटांच्या लढतीत पराभूत करुन पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याच्या शर्यतीत सामील झालीये.

29 वर्षीय अ‍ॅनास्तासियाकडे 50 हून अधिक मोठ्या स्पर्धेत सहभागी होण्याचा अनुभव आहे. 2007 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी तिने विम्बल्डनमध्ये वाइल्डकार्ड एन्ट्रीच्या माध्यमातून ग्रँडस्लॅममध्ये पदार्पण केले होते. या अनुभवाच्या जोरावरत ती बाजी मारुन नवा इतिहास रचणार की बार्बोरा तिला शह देणार हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरेल. दोघींपैकी कोणीही जिंकले तरी फ्रेंच ओपनच्या फायनल लढतीतून नवी सम्राज्ञी मिळणार हे मात्र निश्चित.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT