Naomi Osaka  File Photo
क्रीडा

डिप्रेशनचा सामना करणाऱ्या नाओमीची आयोजकांनी मागितली माफी

नियमावलीच्या उल्लंघनाचा दाखला देत फ्रेंच टेनिस फेडरेशनने तिच्यावर 11 लाख रुपये दंडाची कारवाई केली होती.

सुशांत जाधव

महिला टेनिस जगतात दुसऱ्या स्थानावर असलेल्या जपानच्या नाओमी ओसाकाने (Naomi Osaka) फ्रेंच ओपन (French Open) स्पर्धेतून माघार घेतली आहे. डिप्रेशनमुळे हा निर्णय घेतल्याचे नाओमीने म्हटले आहे. याच कारणामुळे स्पर्धेतील पहिल्या विजयानंतर ती मीडियासमोर आली नव्हती, असेही स्पष्टीकरण तिने दिले. याप्रकरणात नियमावलीच्या उल्लंघनाचा दाखला देत फ्रेंच टेनिस फेडरेशनने तिच्यावर 11 लाख रुपये दंडाची कारवाई केली होती. जपानी खेळाडूने स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आणि त्यासंदर्भातील नेमकं कारण समोर आल्यावर आता फ्रेंच टेनिस फेडरेशनने तिची माफी मागितलीये. (french tennis federation head gilles moretton admitted sorry and sad over naomi osaka withdrawal)

फेडरेशनचे अध्यक्ष जाइल्‍स मोरेटन म्हणाले की, नाओमी ओसाका हिने स्पर्धेतून माघार घेतल्याचा निर्णय दुर्देवी आहे. मानसिक परिस्थितीतून सावरुन ती लवकर कोर्टवर उतरावी, अशी सदिच्छाही मोरेटन यांनी व्यक्त केलीये.

डिप्रेशनचा सामना करतेय नाओमी

नाओमीने फ्रेंच ओपन स्पर्धेत भाग घेतल्यानंतर मीडियाला सामोरे न जाण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या सामन्यानंतर ती म्हणण्यानुसार वागली. त्यानंतर आयोजकांनी तिच्यावर दंडाची कारवाई केली. एवढेच नाही तर पुढेही असे कृत्य केल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला होता. त्यानंतर नाओमी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना तिने स्वत: स्पर्धेतून माघार घेतल्याची घोषणा केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून नाओमीने स्पर्धेतून माघार घेण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

तिने लिहिलंय की, 2018 मधील अमेरिकन ओपन स्पर्धेपासून मी डिप्रेशनचा सामना करत आहे. यातून सावरण्याठी मला कठिण परिस्थितीतून जावे लागत आहे. मी स्वत: मध्ये गुंग असते हे मला ओळखणाऱ्यांना चांगलेच माहित आहे. त्यामुळेच माझ्या कानात तुम्हाला नेहमी हेडफोन वापरते. यामुळे चिंता थोडीफार दूर होण्यास मदत होते, असे नाओमीने लिहिले आहे. पॅरिसमध्ये स्वत:ला असुरक्षित वाटत होते. त्यामुळेच मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता, असा उल्लेखही तिने आपल्या पोस्टमध्ये केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT