Gautam Gambhir and MS Dhoni File Photo
क्रीडा

धोनीच्या बर्थडे दिवशीची 'गंभीर' कृती नेटकऱ्यांना खटकली

गंभीर यांनी जाणीवपूर्वक ही गोष्ट केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.

सुशांत जाधव

भारतीय संघाला आयसीसीच्या सर्व ट्रॉफ्या जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. एका बाजूला हे सर्व घडत असताना दुसऱ्या बाजूला माजी क्रिकेटर आणि विद्यमान खासदर गौतम गंभीर चर्चेत आहेत. धोनीच्या वाढदिवसाच्या दिवशी गंभीर यांनी आपल्या फेसबूकवरील कव्हर फोटो बदलला आहे. त्यांनी 2011 च्या वर्ल्ड कपमधील स्वत:चा फोटो अपलोड केलाय. ही गोष्ट धोनीच्या चाहत्यांना खटकलीये. गंभीर यांनी जाणीवपूर्वक अशी गोष्ट केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. (Gautam Gambhir Change Facebook Cover Photo On MS Dhoni Birthday Netizens Troll Him)

धोनी आणि गंभीर यांच्यात कधीही गोडवा पाहायला मिळालेला नाही. अनेक क्रिकेट दिग्गज धोनीला शुभेच्छा देत असताना गंभीरनं मात्र तो मोठेपणा दाखवलेला नाही, असेही काही नेटकरी म्हणत आहेत. धोनीच्या बर्थडे दिवशी गंभीर यांनी 2011 च्या वर्ल्ड कप फायनलमधील स्वत:चा एक फोटो अपलोड केला. यात तो अर्धशतकानंतर प्रेक्षकांकडे पाहून बॅट उंचावताना दिसतोय.

वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये 'गंभीर' खेळी

2011 मध्ये वानखेडेच्या मैदानात श्रीलंका विरुद्धच्या फायनल सामन्यात गौतम गंभीर यांनी 97 धावांची खेळी केली होती. त्यांचे शतक 3 धावांनी हुकले असले तरी ही खेळी 28 वर्षांनंतर भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाची अशीच ठरली होती. या सामन्यात श्रीलंकेनं पहिल्यांदा बॅटिंग करताना टीम इंडियासमोर 276 धावांचे लक्ष्य ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने 32 धावांतच पहिल्या दोन विकेट गमावल्या होत्या. गंभीरने कोहलीच्या साथीने मिळून 83 धावांची खेळी करत भारताच्या डावाला आकार दिला. त्यानंतर चौथ्या विकेटसाठी त्याने धोनीसोबत शतकी भागीदारी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 India vs UAE : भारत विरुद्ध यूएई सामना लाईव्ह कुठे पाहाल? जाणून घ्या वेळ अन् सर्व काही...

हैद्राबाद गॅझेटिअरनुसार 8 जिल्ह्यांत कुणबी नोंदींची पडताळणी; 'इतकी' कुणबी प्रमाणपत्रे ठरली वैध, हजारो अर्जांची तपासणी सुरूच

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द

Solapur Tourist Places: सोलापूरमध्ये फिरायला जायचंय? मग पावसाळ्यात हे ठिकाणे नक्की एक्सप्लोर करा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा चीझ मशरूम सँडवीच, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT