Gautam Gambhir statement about MS Dhoni esakal
क्रीडा

Gautam Gambhir| धोनी एकदम भारी माणूस; गंभीरचा बदलला सूर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: गेल्या काही वर्षापासून गौतम गंभीर (Gautam Gambhir) सातत्याने भारताचा सर्वश्रेष्ठ कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्र सिंह धोनीवर (Mahendra Singh Dhoni) टीका करत होता. मात्र आता त्याचा सूर बदलला असून गौतम गंभीर धोनीची स्तुती करताना थकत नाही. समालोचक जतिन सप्रूचा यूट्यूब चॅनेल 'ओव्हर अँड आऊट' कार्यक्रमात याबाबत खुलासा केला.

या कार्यक्रमात बोलताना गौतम गंभीरने धोनीबद्दल त्याच्या मनात काय आहे हे स्पष्ट केले. तो म्हणाला की, त्याच्या मनात धोनीबद्दल नितांत आदर (Respect For Dhoni) आहे. मी हे जाहीररित्या पहिल्यांदाही बोललो आहे आणि आताही बोलतो आहे. मी 138 कोटी जनतेच्या समोर सांगतो की जर धोनीला त्याच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची गरज भासली, अडचण आली तर त्याच्या मागे उभा राहणारा मी पहिली व्यक्ती असेन. धोनीने देशासाठी असाधारण काम केले आहे. याचबरोबर तो एक भारी माणूस आहे.

गौतम गंभीर पुढे म्हणाला, ज्यावेळी महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता त्यावेळी मी संघाचा बहुतेक काळ उपकर्णधार होतो. ज्यावेळी आम्ही आयपीएलमध्ये आपापल्या टीमचे कर्णधार झालो त्यावेळी मैदानावर आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी होतो. मात्र धोनी ज्या प्रकारचा खेळाडू आहे. आणि व्यक्ती आहे त्याच्याप्रती माझ्या मनात आदरच आहे. जर धोनीने वरच्या क्रमांकावर बॅटिंग केली असती तर त्याने मर्यादित षटकातील सर्व रेकॉर्ड (White Ball Records) मोडून टाकले असते. गंभीर गांभिर्याने म्हणाला की जर धोनीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली असती तर त्याने सगळे रेकॉर्ड मोडले असते. आपण तिसऱ्या क्रमांकावरच्या फलंदाजाबद्दल बोलत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT