ghana otto addo slams match referee for gift cristiano ronaldo penalty for portugal defeat ghana  
क्रीडा

Cristiano Ronaldo : रोनाल्डोच्या त्या गोलवर घानाच्या प्रशिक्षकांची टीका; म्हणे, हे तर गिफ्ट होतं

सकाळ डिजिटल टीम

फुटबॉल वर्ल्डकपमध्ये पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पोर्तुगालला 3-2 असा विजय मिळवून देत विश्वचषकातील विक्रमी गोल केला. दरम्यान घानाचे प्रशिक्षक ओट्टो एडो यांनी पेनल्टी दिल्याबद्दल अमेरिकन रेफ्रीवर घणाघाती टीका केली आहे. एडो यांनी या रोनाल्डो याला देण्यात आलेल्या पेनल्टीला 'विशेष भेट' असे म्हटले आहे.

रोनाल्डोने गुरुवारी सामन्याच्या उत्तरार्धात पेनल्टी मिळवत त्यावर गोल देखील केला होता आणि यासोबतच तो पाच विश्वचषकांमध्ये गोल करणारा तो पहिला पुरुष खेळाडू बनला आहे. घानाचे कोच इडो म्हणाले की, 'कोणी गोल केला तर त्याचे अभिनंदन. पण खरंतरी ते एक गिफ्टच होतं.' ते म्हणाले की, 'दुसरं काय बोलू? ही रेफरीकडून एक खास भेटच होती'.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

एडो यांनी थेट अमेरिकन रेफ्री इस्माईल एल्फथ यांच्यावर कोणताही इशारा न देता टीका केली, ज्यामुळे त्यांच्यावर फिफाकडून कारवाईची शक्यता देखील आहे. घानाला झालेल्या पराभवाबद्दल विचारले असता, 'रेफरी' असं उत्तर त्यांनी दिलं होतं.

घानाचा डिफेंडर मोहम्मद सलिसू याने 'फाऊल' केला नव्हता असे त्याला वाटते आणि सामना अधिकाऱ्यांनी याची खात्री करण्यासाठी 'व्हीएआर' देखील वापरला नाही अशी त्याची तक्रार आहे. सलिसुच्या मांडीचा रोनाल्डोच्या पायाशी थोडासा संपर्क आल्याने पोर्तुगालचा कर्णधार जमिनीवर पडला असे दिसते. एडो म्हणाले की, 'मला वाटतं तो खरोखरच चुकीचा निर्णय होता.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT