Greek footballer Alexandros Lampis Died in field no defibrillator or ambulance availabe
Greek footballer Alexandros Lampis Died in field no defibrillator or ambulance availabe  esakal
क्रीडा

ग्रीक फुटबॉलपटूचा रूग्णवाहिकेअभावी मैदानातच मृत्यू

अनिरुद्ध संकपाळ

ग्रीसचा फुटबॉलपटू अलेक्झांड्रोस लॅम्पिसचा ह्रदय विकाराचा झटका आल्याने मैदानातच मृत्यू झाला. ज्यावेळी त्याला ह्रदय विकाराचा झटका आला त्यावेळी मैदानात रूग्णवाहिका (Ambulance) आणि शॉक देण्याचे उपकरण (Defibrillator) देखील नव्हते. ही घटना ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये (Athens) घडली. या घटनेनंतर तब्बल 20 मिनिटे रूग्णवाहिका आली नव्हती.

ग्रीसचा 21 वर्षाचा फुटबॉलपटू (Football) लॅम्पिस हा इलिओपोली संघाकडून खेळत होता. तो ग्रीसमधील (Greece) तिसऱ्या टायरमधील फुटबॉल स्पर्धेत खेळत होता. त्यांचा सामना इरमिओनिदा यांच्याबरोबर होता. मात्र या घटनेनंतर हा सामना रद्द करण्यात आला आहे. यानंतर इलिओपोली फुटबॉल क्लबने आपल्या वेबसाईटवर एस संदेश लिहिला, 'आपला अलेको (Alexandros Lampis) आपला मित्र, भाऊ तू आम्हाला साडून गेलास. संपूर्ण संघ, संपूर्ण शहर आज दुःखात आहे. कोणाच्या तोंडातून शब्दच फुटत नाहीयेत. सर्वांच्या चेहऱ्यावर असह्य अशा वेदना आहेत.'

फुटबॉल जगतात तरूण खेळाडूंना मैदानातच ह्रदय विकाराचा झटका येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. युरो कप 2020 (Euro Cup 2020) मध्ये देखील डेन्मार्क आणि फिनलँडच्या सामन्यादरम्यान ख्रिस्तियान एरिकसन (Christian Eriksen) एकाकी मैदानात कोसळला होता. त्यावेळी डॅनिश संघासोबत असणारे डॉक्टर मॉर्टेन बोसेन यांनी एरिकसनला ह्रदय विकाराचा झटका आल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याला सीपीआर (CPR) ट्रिटमेंट देऊन त्याचे ह्रदय पुन्हा सुरू करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT