Harbhajan Singh esakal
क्रीडा

Harbhajan Singh : कोण होणार '2011 चा युवराज', हरभजनच्या मते या खेळाडूमध्ये आहे X फॅक्टर?

अनिरुद्ध संकपाळ

Harbhajan Singh : भारताचा माजी फिरकीपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंगने नुकत्याच झालेल्या इंडिया टुडे कान्क्लेव कार्यक्रमात भारतासाठी कोणता खेळाडू मॅच विनर ठरू शकतो याबाबत आपले मत व्यक्त केले. भारतीय संघात अनेक दर्जेदार आणि गुणवान खेळाडू आहेत त्यामुळे भारतीय संघासमोर कोणत्या खेळाडूला प्लेईंग 11 मध्ये संधी द्यायची हा मोठा प्रश्न असणार आहे. (World Cup 2023)

भारताच्या संघात केएल राहुल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. या सर्वांनी आपली क्षमता वेळोवेळी सिद्ध केली आहे. (Surya Kumar Yadav)

मात्र संघ व्यवस्थापनाला या खेळाडूंमधून फक्त तीन खेळाडूंची अंतिम 11 च्या संघात निवड करायची आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी गेल्या काही काळापासून वनडे क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत आपली प्रबळ दावेदारी सिद्ध केली आहे.

दरम्यान, हरभजनने मात्र सूर्यकुमारच्या पारड्यात आपले वजन टाकले आहे. इंडिया टुडेच्या कॉन्क्लेवमध्ये बोलताना हरभजन म्हणाला, 'मी सूर्यकुमार यादवबाबत आशावादी आहे. त्याच्याकडे एक्स फॅक्टर आहे.'

'तो ज्यावेळी आपल्या लयीत फलंदाजी करायला लागेल त्यावेळी तो फक्त तुम्हाला सामना नाही तर स्पर्धाच जिंकून देण्याची क्षमता ठेवतो. जर मी निवडसमितीमध्ये असतो तर माझ्या संघात कर्णधारानंतर सूर्यकुमार यादवचं नाव दुसऱ्या क्रमांकावर असतं. ते सूर्याला खेळवणार की नाही हे माहिती नाही.'

हरभजन पुढे म्हणाला की, 'मला माहिती नाही की त्याबाबत काय निर्णय घेतला जाणार आहे. आज त्याला गोलंदाजी करताना मला नक्कीच घाम फुटेल. पण मी माझ्या सर्वोच्च शिखरावर होतो त्यावेळी असं घडलं नसतं. तो मला एबी डिव्हिलियर्सची आठवण करून देतो. आपल्याला त्याच्यासारख्या खेळाडूने संघात खेळणे गरजेचे आहे.'

'तो जरी फ्लॉप गेला तरी मी त्याला पुढच्या सामन्यात नक्की खेळवणार. सूर्यकुमारनंतर मी शुबमन गिलचं नाव घेईन. आपलं नाव क्रिकेट इतिहासात अजरामर करण्याची त्याच्याकडे संधी आणि क्षमता देखील आहे.'

(Cricket World Cup Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT