Hardik Pandya Captaincy IND vs NZ 3rd T20 esakal
क्रीडा

Hardik Pandya : माझं पतन माझ्या शर्तींवर होणार! मालिका विजयानंतर हार्दिक गरजला

अनिरुद्ध संकपाळ

Hardik Pandya Captaincy IND vs NZ 3rd T20 : भारताने टी 20 इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय मिळवला. भारताने न्यूझीलंडचा तिसऱ्या टी 20 सामन्यात 168 धावांची पराभव केला. भारताच्या 235 धावांचा डोंगर सर करण्यासाठी मैदानात उतरलेल्या किवींचा डाव 12.1 षटकात 66 धावात संपुष्टात आणला. भारताकडून शुभमन गिलने 126 धावांची नाबाद आक्रमक खेळी केली. तर हार्दिक पांड्याने 16 धावात 4 विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्याला मालिकावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला.

सामना झाल्यानंतर विजयी कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला, 'मला मालिकावीराचा पुरस्कार जिंकल्याचे काही वाटत नाहीये. अनेक जणांनी अद्वितीय कामगिरी केली आहे. ही मालिकावीराची ट्रॉफी मी आमच्या सपोर्ट स्टाफला समर्पित करत आहेत. मी त्या सर्वांसाठी आनंदी आहे. त्यांनी वेगळा विचार केला.'

हार्दिक पांड्या आपल्या कॅप्टन्सीबद्दल बोलताना पुढे म्हणाला की, 'मला असा सामना खेळलायला नेहमी आवडते. मी परिस्थितीचा अभ्यास करायचा प्रयत्न करत अशतो. मला आधीच्याच जुन्या आयडिया फारशा रूचत नाहीत. माझ्या कॅप्टन्सीमध्ये मी गोष्टी सोप्या ठेवायचा प्रयत्न करतो. मी माझ्या गट्सवर विश्वास ठेवतो.'

पांड्याने आपल्या एका नियमाबद्दलही सांगितले. तो म्हणाला, 'माझा एक सोपा नियम आहे. जर माझं पतन होणार असेल तर ते माझ्या शर्तींवर होईल. आम्ही कायम आव्हानाचा मुकाबला करण्याबाबत बोलत असतो. आम्ही ज्यावेळी या मैदानावर फायनल खेळली होती. त्यावेळी आम्हाला वाटले की दुसरी इनिंग ही अधिक रंजक असते. मात्र आज या खेळपट्टीवर मला एक सर्वसाधारण सामना खेळायचा होता. कारण हा मालिका ठरवणारा सामना होता. म्हणून आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.'

(Sports Latest News)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शॉ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP removes spokesperson Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीत फूट? प्रवक्ता विजेता दहियांचे संस्थापक अभिजीत दिपकेंवर गंभीर आरोप, 'मलाच बळीचा बकरा बनवलं'

Kidney Donation Case : बॉसला किडनी दिली तरीही कंपनीने नोकरीवरुन काढले, महिलेला माणुसकी जपणे पडले महागात; नेमकं काय घडलं?

Latest Marathi Update : उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा! शिवाजी पार्कवरून मोर्चा काढणार

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

SCROLL FOR NEXT