Hardik Pandya Share Video enjoying swimming pool session with His Son Agastya  esakal
क्रीडा

VIDEO: डच्चू मिळालेला हार्दिक स्विमिंग पूलमध्ये करतोय मजामस्ती

अनिरुद्ध संकपाळ

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) भारताच्या कसोटी, वनडे आणि आता टी 20 संघात देखील स्थान मिळालेले नाही. हार्दिक पांड्याने रणजी ट्रॉफीमधून (Ranji Trophy) देखील माघार घेतली आहे. सध्या क्रिकेट (Cricket) सामन्यांपासून दूर असलेला हार्दिक पांड्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. आपला मुलगा अगस्त्याबरोबर (Agastya) तो मजा मस्ती करत असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हार्दिक पांड्या अष्टपैलू म्हणून संघात स्थान मिळवण्यास अजून फिट (Hardik Pandya Fitness) नाही. तो पाठीच्या दुखापतीनंतर सामन्यात गोलंदाजी करताना फारसा दिसलेला नाही. त्यामुळे त्याला भारतीय संघातील आपले स्थान देखील गमावावे लागले आहे. तो यापूर्वी भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये शेवटचा खेळताना दिसला होता. त्याला न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि आता श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी देखील संघात स्थान देण्यात आलेले नाही. दरम्यान, हार्दिक पांड्याने रणजी ट्रॉफीमधूनही माघार घेतली आहे. त्यामुळे आता तो थेट आयपीएलमध्येच (IPL) खेळताना दिसणार आहे. सध्या हार्दिक आपल्या मुलासोबत वेळ घालवत आहे.

त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर मुलगा अगस्त्या आणि तो स्विमिंग पूलमध्ये मजामस्ती करत असलेला व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओला त्याने 'कूलेस्ट वॉटर बेबी' असे कॅप्शन दिले आहे.

निवडसमिती अध्यक्ष चेनत शर्मा (Chetan Sharma) यांनी श्रीलंका दौऱ्यासाठी संघाची घोषणा केल्यानंतर त्यांना हार्दिक पांड्याबाबत देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी हार्दिक पांड्याचा ज्यावेळी तो 100 फिट होईल त्यावेळीच विचार केला जाईल असे सांगितले. ते म्हणाले की, 'निश्चितच हार्दिक पांड्या टीम इंडियाचा एक महत्वाचा भाग आहे. ज्यावेळी तो 100 टक्के फिट होईल आणि गोलंदाजी (Hardik Pandya Bowling) करायला लागले त्यावेळी त्याला पुन्हा संघात स्थान देण्याबाबत विचार केला जाईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

SCROLL FOR NEXT