Pak vs Ned Bas De Leede Injury sakal
क्रीडा

VIDEO : हरिस रौफच्या जीवघेण्या बाऊन्सरने फलंदाज रक्तबंबाळ

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने फलंदाजाला दिवसा तारे दाखवले

Kiran Mahanavar

Pak vs Ned Bas De Leede Injury : टी-20 विश्वचषकात पाकिस्तानने पहिला विजय मिळवला आहे. भारत आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर त्यांनी पर्थमध्ये नेदरलँड्सचा पराभव केला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने दिवसा फलंदाजाला तारे दाखवले. पर्थमध्ये हा सामना खेळला जात असताना हारिसचा एक चेंडू नेदरलँडचा फलंदाज बास डी लीडेच्या हेल्मेटला लागला, त्यानंतर फलंदाजाच्या डोळ्याखालून रक्त वाहू लागले.

नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर अवघ्या तिसऱ्या षटकात संघाला पहिला धक्का बसला. स्टीफन मायबर्ग बाद झाल्यानंतर बेस डी लीडे फलंदाजीसाठी मैदानात आला. सहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने लेईडला बाऊन्सर टाकला जो थेट हेल्मेटला लागला. बॅट्समनला गंभीर दुखापत झाली. हेल्मेटने चेंडू आदळल्यानंतर तो जमिनीवर बसला. यानंतर फिजिओला मैदानात बोलावण्यात आले, त्याने फलंदाजाला रिटायर्ड हर्ट झाल्याने मैदानाबाहेर काढण्याचा सल्ला दिला. तो बेस डी लीड मैदानातून बाहेर पडत असताना त्याच्या डोळ्याखाली झालेली जखम कॅमेराने टिपली.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर नेदरलँड संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 91 धावा केल्या. पाकिस्तानच्या संघाने 13.5 षटकांत चार विकेट गमावत 94 धावा करून सामना जिंकला. मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 49 धावा केल्या. या सामन्यात कर्णधार बाबर आझम काही खास करू शकला नाही. पाच चेंडूत चार धावा करून तो धावबाद झाला. नेदरलँड्सकडून ब्रँडन ग्लोव्हरने दोन आणि व्हॅन मीकेरेनने एक विकेट घेतली. पाकिस्तानचा हा पहिला विजय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 1st ODI: ऋतुराज गायकवाड OUT! शुभमन गिलने Playing XIचे दिले संकेत; अक्षर पटेल- लोकेश राहुल यांच्याबाबत होणार टॉस, नेमकी असा असेल संघ?

Mumbai News: ...ही न्यायाची थट्टा! भूखंडाचा ताबा देण्याचे म्हाडाला निर्देश, याचिकाकर्त्याला दिलासा

‘जोगवा’मधील एका क्लोज शॉटने बदललं उपेंद्र लिमयेंचं नशीब! राजीव पाटील यांची भविष्यवाणी ठरली खरी

Latest Marathi News Live Update : आयएएस राकेश अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी आरोपी नोकरासोबत पोलिसांची चकमक

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! 2 महिन्यांत 27 हजारांनी स्वस्त; सोनं 1 लाखांवर येणार? ताजा भाव किती?

SCROLL FOR NEXT