Indian women’s cricket team captain Harmanpreet Kaur celebrates her historic century in England, setting a new milestone in international women’s cricket.  esakal
क्रीडा

Harmanpreet Kaur: भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने इंग्लंडमध्ये रचला इतिहास!

Harmanpreet Kaur creates history: जाणून घ्या, नेमकी कोणती कामगिरी केली आहे; तसेच इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हरमनप्रीत कौरने शानदार शतकही झळकावले आहे.

Mayur Ratnaparkhe

Harmanpreet Kaur Creates History in England: इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने इतिहास रचला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४ हजार धावांचा टप्पा गाठणारी हरमनप्रीत कौर आता तिसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तिच्या आधी फक्त मिताली राज आणि स्मृती मानधना यांनी हा पराक्रम केलेला आहे. त्यानंतर आता हरमनप्रीत कौर हिचा विशेष यादीत समावेश झाला आहे.

हरमनप्रीत कौरने १४९ एकदिवसीय सामन्यांच्या १२९ डावांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण केल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम स्मृती मानधना हिच्या नावावर आहे.  तिने फक्त ९५ डावांमध्ये हा टप्पा गाठला होता.

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावले. तिने ८४ चेंडूत १०२ धावांची शानदार खेळी खेळली. यादरम्यान तिने तब्बल १४ चौकार मारले आहेत. हरमनप्रीत कौरने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एक मोठा टप्पा गाठला आहे.

या सामन्यात तिने फक्त ८२ चेंडूत तिचे सातवे एकदिवसीय शतक पूर्ण केले आहे. यासह, ती महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी दुसरी सर्वात जलद शतक करणारी फलंदाज बनली आहे. दुसरे सर्वात जलद शतक करण्याचा विक्रमही यापूर्वी हरमनप्रीतच्याच नावावर होता. २०२४ मध्ये तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८५ चेंडूत शतक पूर्ण केले होते.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय महिला खेळाडूंमध्ये मिताली राज - ७ हजार ८०५ धावा, स्मृती मानधना - ४ हजार ५८८ धावा, हरमनप्रीत कौर – ४ हजारांपेक्षा अधिक धावा, अंजुम चोप्रा - २ हजार ८५६ धावा, दीप्ती शर्मा - २ हजार ३०० धावा यांचा समावेश आहे. तर भारतासाठी महिला क्रिकेटमधील सर्वात जलद शतकं करणाऱ्या खेळाडूंमध्ये स्मृती मानधना - ७० चेंडू, हरमनप्रीत कौर - ८२ चेंडू, हरमनप्रीत कौर - ८५ चेंडू, जेमिमा रॉड्रिग्ज - ८९ चेंडू यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Girl Case: महिलांच्या रक्षणासाठी भाऊ कुठेय? कल्याण मारहाण प्रकरणी ठाकरे गट आक्रमक; गृहमंत्र्यांवर शरसंधान

ENG vs IND: जैस्वालला चौथ्या कसोटीत तासाभरातच अचानक बदलायला लागली बॅट, नेमकं काय घडलं, पाहा Video

Latest Maharashtra News Updates : गटारीनिमित्त एका माजी नगरसेवकाने वाटलं चक्क चिकन

घाबरलो नाही तर..! सलमानने बाल्कनीच्या बुलेटप्रूफ काचेसाठी दिलं अजब कारण; ऐकून तुम्हीही डोक्यावर हात माराल

Kalyan Girl Assault Update: मारहाणीची सुरूवात कोणी केली? कल्याणमधल्या रिसेप्शनिस्टच्या मारहाणीचा संपूर्ण व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT