Harmanpreet Kaur Supernovas Defeat Smriti Mandhana Trailblazers in Women T20 Challenge
Harmanpreet Kaur Supernovas Defeat Smriti Mandhana Trailblazers in Women T20 Challenge esakal
क्रीडा

SPN vs TRL : पहिल्याच सामन्यात स्मृतीला हरमनप्रीतने दिली मात

अनिरुद्ध संकपाळ

पुणे : Women T20 Challenge स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हाजने स्मृती मानधनाच्या ट्रेलब्लेझरचा 49 धावांनी पराभव केला. सुपरनोव्हाजने ठेवलेल्या 164 धावांचा पाठलाग करणाऱ्या ट्रेलब्लेझरला 20 षटकात 9 बाद 114 धावांपर्यंतच मजल मारता आली. सुपरनोव्हाजकडून पूजा वस्त्राकारने भेदक मारा करत 12 धावात 4 बळी टिपले. तर फलंदाजीत कर्णधार हरमनप्रीतने 37 धावांची खेळी केली. तर ट्रेलब्लेझरकडून स्मृती मानधनाने सर्वाधिक 34 धावा केल्या. तर गोलंदाजीत हेली मॅथ्यूजने 3 विकेट घेतल्या. (Harmanpreet Kaur Supernovas Defeat Smriti Mandhana Trailblazers in Women T20 Challenge)

सुपरनोव्हाजने ठेवलेल्या 164 धावांचा पाठलाग करतानाचा ट्रेलब्लेझरने देखील चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. हेली मॅथ्यूज आणि स्मृती मानधना यांनी 39 धावांची सलामी दिली. मात्र पूजा वस्त्राकारने हेलीला 18 धावांवर बाद करत ट्रेलब्लेझरला पहिला धक्का दिला. त्यानंतर स्मृती मानधना देखील 23 चेंडूत 34 धावांची खेळी करून माघरी परतली.

स्मृती बाद झाल्यानंतर ट्रेलब्लेझरचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. सुनपरनोव्हाची वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकारने भेदक मारा करत एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी धाडण्यास सुरुवात केली. तिने चार षटकात 12 धावा देत 4 बळी टिपले. त्यामुळे ट्रेलब्लेझरनची अवस्था 2 बाद 63 धावांवरून 7 बाद 77 अशी झाली.

दरम्यान, जेमिमाह रॉड्रिग्जने एक बाजू लावून धरली होती. मात्र दुसऱ्या बाजूने एकही फलंदाज तग धरू शतक नव्हती. अखेर मेघना सिंहने रॉड्रिग्जची 24 धावांची झुंज संपवली. त्यानंतर रेणुका सिंह आणि राजेश्वरी गायकवाडने सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. रेणुका सिंहने 14 तर राजेश्वरीने 7 धावा करत ट्रेलब्लेझरला 20 षटकात 9 बाद 114 धावांपर्यंत पोहचवले. सुपरनोव्हाजने 49 धावांनी सामना जिंकला.

Women T20 Challenge स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सुपरनोव्हाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुपरनोव्हाजच्या सलामीवीर प्रिया पुनिया आणि डिएन्द्रा डॉटिन यांनी पाच षटकात 50 धावांची दमदार सलीमी देत ट्रेलब्लेझरच्या गोलंदाजांची पॉवर प्लेमध्ये चांगलीच धुलाई केली.

मात्र सुपरनोव्हाजला दमदार सुरूवात करून देणारी डॉटिनला रेणुका सिंहने 32 धावांवर धावबाद केले. त्यानंतर हेयले मॅथ्यूजने सुपरनोव्हाजच्या 20 चेंडूत 22 धावा करणाऱ्या प्रिया पुनियाचा त्रिफळा उडवला. या पडझडीनंतर हर्लीन देओल आणि हरमनप्रीत कौरने सुपरनोव्हाचा डाव सावरत शतकी मजल मारून दिली.

दरम्यान, 19 चेंडूत 35 धावांची खेळी करणाऱ्या हरलीने देओलला सलमा खातूनने बाद केले. यानंतर हरमनप्रीतने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. मात्र दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत होत्या. राजेश्वरी गायकवाडने सनी लूसला 10 धावांवर, सलमा खातूनने अॅना किंग्जला 5 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या पूजा वस्त्राकारने 14 धावांची भर घातली मात्र तिला पूनम यादवने बाद करत सुपरनोव्हाला सहावा धक्का दिला.

दरम्यान, 29 चेंडूत 37 धावांची खेळी करत संघाला 150 चा टप्पा पार करून दिला. मात्र ती धावबाद झाली अन् सुपरनोव्हाजच्या धावगतीला ब्रेक लागला मॅथ्यूजने सोफी इकलस्टोनला 5 धावांवर बाद झाली तर मेघना सिंग देखील 2 धावा करून धावबाद झाली. अखेर मॅथ्यूजने व्ही चंदूला पायचित करत सुपरनोव्हाचा डाव 163 धावात संपवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT