A collapsed basketball pole at a sports ground in Haryana where a young player tragically lost his life during practice, leading to the suspension of the sports officer.

 

esakal

क्रीडा

Basketball Player Death : सराव करताना खांब अंगावर पडून बास्केटबॉल खेळाडूचा मृत्यू; क्रीडा अधिकारी निलंबित!

Haryana basketball player death : हरियाणाच्या क्रीडा मंत्र्यांनी घेतली घटनेची गंभीर दखल; क्रीडा महासंचालकांनी हरियाणामधील सर्व जिल्ह्यांतील क्रीडा अधिकाऱ्यांना पाठवले पत्र

Mayur Ratnaparkhe

Haryana Basketball Player Dies During Practice : हरियाणातील रोहतक येथे सराव करताना एका १६ वर्षीय आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडूचा खांब अंगावर पडल्याने मृत्यू झाला. त्यानंतर, हरियाणाचे क्रीडा मंत्री गौरव गौतम यांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यास निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत.

याशिवाय या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, क्रीडी मंत्र्यांनी सांगितले की, ज्या अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे खेळाडूचा मृत्यू झाला त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

दरम्यान, क्रीडा महासंचालकांनी हरियाणामधील सर्व जिल्ह्यांतील क्रीडा अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले. त्यात, त्यांना जिल्ह्यांतील जीर्ण क्रीडा पायाभूत सुविधा दुरुस्त करण्याचे आणि खराब क्रीडा उपकरणे वापरणे टाळण्याचे आदेश दिले आहेत.

तर काँग्रेस नेत्या विनेश फोगट यांनी या घटनेवरून हरियाणा सरकावर टीका केली आहे."सत्य हे आहे की हरियाणातील मुले मैदानात आपले प्राण गमावत आहेत आणि भाजप सरकार कागदपत्रांमध्ये व जाहिरातींमध्ये 'विकास' शोधत आहे. हे व्यवस्थेचे अपयश नाही तर व्यवस्थेची हत्या आहे. त्यासोबतच, मुलांची स्वप्ने, त्यांचा विश्वास आणि त्यांचे भविष्य मारले जात आहे. हे क्रीडा धोरण नाही, तर खेळाडूंच्या स्वप्नांची ही उघड हत्या आहे." असं विनेश फोगट यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fire: भीषण अग्नितांडव! सात इमारतींना आग, १३ जणांचा मृत्यू; ७०० लोकांचं स्थलांतर

संमतीचे शरीरसंबंध म्हणजे अत्याचार नव्हे! 12 महिने दोघांमध्ये संबंध, मग तो बलात्कार ठरतोच कसा?, बॅंक अधिकाऱ्याला न्यायालयाने निर्दोष सोडले; काय झाला युक्तिवाद?

लाचखोर कृषी अधिकाऱ्याच्या घरात ६ पोती कांद्याचे बियाणे! 'लाचलुचपत'च्या अधिकाऱ्यांनी घेतली घराची झडती; शेतकऱ्याने दिलेले ८००० रुपये ठेवले फाईलमध्ये

आवक कमी, तरीही कांद्याला प्रतिक्विंटल १८०० रुपयांपर्यंतच भाव! अतिवृष्टी, थंडीमुळे कांद्याला काजळी; सोलापुरातून गतवर्षीपेक्षा यंदा आवक दोन पटीने घटली

सरकारचा नवा निर्णय! गावातील, शहरातील माकडं पकडा अन्‌ ६०० रुपये मिळवा; मनुष्यांवरील हल्ले अन्‌ शेतीचे नुकसान टाळण्यासाठी वन विभागाचा निर्णय, वाचा...

SCROLL FOR NEXT