Pat Cummins leaves IPL 2022 early with hip injury  esakal
क्रीडा

पॅट कमिन्स IPL स्पर्धेमधून बाहेर, मायदेशी लवकरच परतणार

प्ले ऑफमध्ये पोहचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे.

धनश्री ओतारी

प्ले ऑफमध्ये पोहचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला(Pat Cummins) दुखापत झाली असुन तो संपूर्ण आयपीएल टूर्नामेंटमधून बाहेर पडला आहे. तसेच तो, लवकरच त्याच्या मायदेशी परतणार आहे.

यंदाच्या आयपीएल 15 व्या सीझनमध्ये पॅट कमिन्सचे कामगिरी विशेष अशी कामगिरी केलेली नाही. त्याला केवळ एकच मॅच जिंकवण्यात यश मिळाले आहे. मात्र, गोलंदाजीमध्ये तो खास कामगिरी करु शकला नाही. त्याच्या कंबरेला दुखापत झाल्याने तो मायदेशी परतत आहे. तो आगामी संपूर्ण टूर्नामेंटमधून बाहेर पडला आहे. आयपीएल संपण्यापूर्वीच तो त्याच्या मायदेशी परतणार आहे. मात्र, त्याची दुखापत गंभीर नसल्याचे समोर आले आहे.

जून आणि जुलै मध्ये ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात तीन टी 20, पाच वनडे आणि दोन टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. कमिन्स टेस्ट टीमचा कर्णधार आहे.

कमिन्सला कोलकाताने 7.25 कोटीला विकत घेतले होते. कमिन्सने सुरुवातीच्या मॅचमध्ये तुफानी फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. मात्र, एकही विकेट घेऊ शकला नाही. त्याला काही सामन्यातून बाहेर ठेवण्यात आलं होते. त्याने पाच मॅचमध्ये 262.50 स्ट्रईक रेटने 63 धावा केल्या. तर 19.5 ओव्हरमध्ये त्याच्या नावावर सात विकेट आहेत.

आयपीएल दरम्यान त्याचा स्नायू दुखावला. त्याला झालेली दुखापत बरी होण्यास फार कालावधी लागणार नाही. मात्र, श्रीलंका दैऱ्यापूर्वी त्याला विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे तो मायदेशी परतत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ३० वर्षांनंतरही न्यायाची प्रतीक्षा; सर्वोच्च न्यायालयात १० हजार, उच्च न्यायालयांत ८० हजारांहून अधिक खटले प्रलंबित

Beed Road Protest: रस्त्यासाठी ‘रास्ता रोको’; ग्रामस्थांचा एल्गार; डाबी फाट्यावर वाहतूक ठप्प; विद्यार्थ्यांनीही घेतला सहभाग

Radhanagari Dam : राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद; कोल्हापूरवरील पुराचा धोका टळला, १,४०० क्यूसेक विसर्ग कायम

'पाकिस्तान माझी मावशी आहे' धर्मेंद्र यांची आठवण काढत सनी देओल म्हणाला...

Lashkar-e-Taiba Claim : भारतीय एजंट्सनी पाकिस्तानात घुसून ३० दहशतवादी केले ठार: लष्करच्या हस्तकाचा धक्कादायक दावा

SCROLL FOR NEXT