Asian Champions Trophy Hocky India Sakal
क्रीडा

Asian Champions Trophy : हॉकी इंडिया जेतेपदाची प्रबळ दावेदार

आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने दमदार कामगिरी करुन दाखवलीये.

सुशांत जाधव

आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने दमदार कामगिरी करुन दाखवलीये. साखळी फेरीतील अपराजित भारतीय संघ आता सेमी फायनलमध्ये जपानविरुद्ध भिडणार आहे.

Asian Champions Trophy : आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात विजयापासून दूर राहिलेला भारतीय पुरुष हॉकी संघाने (Hockey India) सेमी फायनल गाठलीये. दक्षिण कोरिया विरुद्धचा सामना 2-2 असा बरोबरीत सुटल्यानंतर हॉकी इंडियाने विजयी धडाका सुरु केला. ढाकामध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत सेमी फायनलमध्ये त्यांच्यासमोर आता जपानच्या हॉकी (Japan) संघाचे आव्हान असणार आहे. मंगळवारी 21 डिसेंबरला दोन्ही संघातील सेमी फायनल खेळवण्यात येईल.

आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात विजयापासून दूर राहिलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने सेमी फायनल गाठलीये. दक्षिण कोरिया विरुद्धचा सामना 2-2 असा बरोबरीत सुटल्यानंतर हॉकी इंडियाने विजयी धडाका सुरु केला. ढाकामध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत सेमी फायनलमध्ये त्यांच्यासमोर आता जपानच्या हॉकी संघाचे आव्हान असणार आहे. मंगळवारी 21 डिसेंबरला दोन्ही संघातील सेमी फायनल खेळवण्यात येईल.

मनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. राउंड रॉबिन पद्धतीने खेळवण्यात आलेल्या अखेरच्या लढतीत भारतीय संघाने जपानला 6-0 असे पराभूत केले होते. त्यामुळे सेमी फायनलमध्ये भारताचे पारडे जड आहे.

आशियाई चॅम्पियनशिप हॉकी स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या लढतीत टीम इंडियाने दमदार कामगिरी नोंदवली आहे. गुणतालिकेत 10 गुणांसह भारतीय संघ अव्वल राहिला. भारताच्या पाठोपाठ या यादीत दक्षिण कोरियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी 6 गुण कमावले आहेत. जपानने गुणांसह सेमीफायनल पक्की केली असून पाच गुणांसह पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. पाच देशांच्या स्पर्धेत यजमान बांगलादेशची कामगिरी सर्वात सुमार राहिली. त्यांचे स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. त्यांना स्पर्धेतील एकही सामना जिंकता आला नाही.

अशी राहिली भारतीय संघाची कामगिरी

आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाची पहिली लढत दक्षिण कोरिया विरुद्ध झाली. या सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीला गोल नोंदवून आघाडी घेतली. पण अखेरच्या टप्प्यात झालेल्या चुकांमुळे दक्षिण कोरियाने सामना 2-2 बरोबरीत सोडवला. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने यजमान बांगलादेशचा 9-0 असा धुव्वा उडवत दमदार कमबॅक केले. तिसऱ्या लढतीत भारताने पाकिस्तानला 3-1 असे पराभूत केले. तर अखेरच्या सामन्यात त्यांनी जपानला 6-0 असा पराभवाचा दणका दिला.

भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार

भारतीय हॉकी संघाने यावर्षी दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. भारतीय संघाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती. आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी स्पर्धेत अपराजित राहून टीम इंडियाने जेतेपद आपल्याकडेच कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. संघाला सेमीफायनलपर्यंत पोहचवण्यामध्ये सर्वांनीच मोलाचा वाटा उचलला आहे. गतवर्षी भारतीय संघानेची ही ट्रॉफी जिंकली होती. ती आपल्याकडे कामय ठेवण्यासाठी भारतीय संघ उत्सुक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

ICUत उंदराने कुरतडला हात, १२ तासांत महिला रुग्णाचा मृत्यू; रुग्णालयाने डॉक्टरसह नर्सवर केली कारवाई

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT