Hockey World Cup 2023  esakal
क्रीडा

Hockey World Cup 2023 : भारतीय हॉकीपटू कोटीत खेळणार; ओडिसाचे मुख्यमंत्री पटनायक यांची घोषणा

अनिरुद्ध संकपाळ

Hockey World Cup 2023 : हॉकी वर्ल्डक 2023 हा ओडिसामध्ये होणार आहे. हा वर्ल्डकप खास करण्यासाठी ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी चांगलीच कंबर कसली आहे. याचदरम्यान मुख्यमंत्र्यांनी भारतीय हॉकीसंघासाठी एक खास घोषणा देखील केली. त्यांनी जर भारतीय संघाने यंदाचा हॉकी वर्लडकप जिंकला तर प्रत्येक खेळाडूला मोठी बक्षीस रक्कम देण्याची घोषणा केली.

नवीन पटनायक हे राऊरकेलाच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी बिसरा मुंडा हॉकी स्टेडियमच्या परिसरातील वर्ल्डकप व्हिलेजचे उद्घाटन केले. हे वर्ल्डकप व्हिलेज फक्त 9 महिन्यात तयार करण्यात आले आहे. यामध्ये हॉकी वर्ल्डकपच्या स्तरानुसार सर्व सुविधांनी युक्त असे 225 रूम्स तयार करण्यात आल्या आहेत. या व्हिलेजमध्ये आगामी हॉकी वर्ल्डकप खेळण्यासाठी आलेले संघ आणि त्यांचे पदाधिकारी राहणार आहेत.

उद्घाटनानंतर मुख्यमुंत्री नवीन पटनायक यांनी वर्ल्डकप व्हिलेजमध्ये थांबलेल्या राष्ट्रीय पुरूष हॉकी संघासोबत चर्चा केली. पटनायक यावेळी म्हणाले की, 'जर आपला देश वर्ल्डकप जिंकला तर भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी 1 कोटी रूपये देण्यात येतील. मी भारतीय संघाला शुभेच्छा देतो आणि ते वर्ल्ड चॅम्पियन होतील अशी आशा आहे.' (Sports Latest News)

यावेळी भारतीय संघातील खेळाडूंनी देखील भुवनेश्वरमध्ये हॉकीचा विकास होण्यासाठी उभारलेल्या पायाभूत सुविधांसाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या कार्यक्रमावेळी ओडिसाचे क्रीडा मंत्री टिके बेहरा, हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT