Hockey World Cup 2023 Opening Ceremony
Hockey World Cup 2023 Opening Ceremony  esakal
क्रीडा

Hockey World Cup 2023 : रणवीर, दिशा पटानीसह स्टार करणार परफॉर्म, कधी अन् कोठे पहायचा Opening Ceremony?

अनिरुद्ध संकपाळ

Hockey World Cup 2023 Opening Ceremony : ओडिसामध्या येत्या 13 जानेवारीपासून हॉकी वर्ल्डकपचा 15 वा हंगाम सुरू होत आहे. याचा उद्घाटन सोहळा आज कटकमध्ये सायंकाळी 6 वाजल्यापासून सुरू होईल. या उद्घाटन सोहळ्यात हिंदी चित्रपटसृष्टीतला आघाडीचा अभिनेता रणवीर सिंह आणि दिशा पटानी यांच्यासह अनेक स्टार्स आपली कला सादर करणार आहेत.

भारतात होत असलेल्या 15 व्या हॉकी वर्ल्डकपमध्ये 16 देश ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. गतविजेता बेल्जियम आपले गतविजेतेपद टिकवण्यासाठी प्रयत्न करतील. यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलिया विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. तर यजमान भारतही आपल्या मायदेशात होत असलेल्या वर्ल्डकपवर दावेदारी सांगत आहे.

ओडिसा हॉकी वर्ल्डकपचे दुसऱ्यांदा यजमानपद भुषवत आहे. यावेळी राऊलकेलाच्या बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वर्ल्डकपमधील सामने खेळवले जाणार आहे. याचबरोबर भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर देखील सामने खेळवले जातील. भुवनेश्वरमध्ये 2018 मध्ये वर्ल्डकपचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

वर्ल्डकप कोठे पाहता येणार?

FIH पुरुष हॉकी वर्ल्डकप 2023 स्टार स्पोर्ट्सवर दाखवला जाणार आहे. भारतातील हॉकी चाहते सर्व सामने स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकतात.

हॉकी वर्ल्डकपचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होणार?

हॉकी वर्ल्डकप 2023 च्या सर्व सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग देखील होणार आहे. हे लाईव्ह स्ट्रीमिंग Disney+Hotstar वर होणार आहे. यासाठी तुम्हाला Disney+Hotstar चे प्रीमियम सब्सक्रिप्शन घ्यावे लागले. त्याशिवाय तुम्हाला लाईव्ह सामने पाहता येणार नाहीत.

(Sports Latest News)

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT