Hockey World Cup 2023 Opening Ceremony  esakal
क्रीडा

VIDEO : रणवीरचा डान्स ते दिशाचे ठुमके! हॉकी वर्ल्डकप Opening Ceremony एका क्लिकवर

अनिरुद्ध संकपाळ

Hockey World Cup 2023 Opening Ceremony : ओडिशाच्या कटकमध्ये हॉकी वर्ल्डकप 2023 चा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यात बॉलीवूडचे स्टार रणवीर सिंग आणि दिशा पटानी यांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले. याचबरोबर प्रसिद्ध संगीतकार प्रीतम यांनी देखील आपल्या गाण्यांनी हॉकी चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. या उद्घाटन सोहळ्याला ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर देखील उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी हॉकी वर्ल्डकप पुन्हा एकदा ओडिसामध्ये आयोजित करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी जगभरातील हॉकी संघांचे ओडिसात स्वागत केले.

हॉकी वर्ल्डकप 2023 च्या उद्घाटन सोहळ्याचा VIDEO

भारतात येत्या 13 जानेवारीपासून होत असलेल्या 15 व्या हॉकी वर्ल्डकपमध्ये 16 देख ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. गतविजेता बेल्जियम आपले गतविजेतेपद टिकवण्यासाठी प्रयत्न करतील. यंदाच्या वर्षी ऑस्ट्रेलिया विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. तर यजमान भारतही आपल्या मायदेशात होत असलेल्या वर्ल्डकपवर दावेदारी सांगत आहे.

वर्ल्डकप कोठे पाहता येणार?

FIH पुरुष हॉकी वर्ल्डकप 2023 स्टार स्पोर्ट्सवर दाखवला जाणार आहे. भारतातील हॉकी चाहते सर्व सामने स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकतात.

हॉकी वर्ल्डकपचे लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे होणार?

हॉकी वर्ल्डकप 2023 च्या सर्व सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग देखील होणार आहे. हे लाईव्ह स्ट्रीमिंग Disney+Hotstar वर होणार आहे. यासाठी तुम्हाला Disney+Hotstar चे प्रीमियम सब्सक्रिप्शन घ्यावे लागले. त्याशिवाय तुम्हाला लाईव्ह सामने पाहता येणार नाहीत.

(Sports Latest News)

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT