I had asked the PCB to make Babar Azam captain Imran Khan  
क्रीडा

Imran Khan : माझ्यामुळेच बाबर कर्णधार! इम्रान खान यांचा मोठा दावा

पाकच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर इम्रान खानने केला मोठा दावा

सकाळ ऑनलाईन टीम

Babar Azam captain Imran Khan : बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या संघाने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सुरुवातीला पाकिस्तान उपांत्य फेरीतही पोहोचणार नाही असे वाटत होते. पण नंतर पाकिस्तानच्या संघाने चांगली कामगिरी करत अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी दावा केला आहे की त्यांनीच पीसीबीला बाबर आझमला कर्णधार बनवण्याची विनंती केली होती.

पाकिस्तानचा संघ २०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेत पहिल्याच फेरीमधून बाहेर पडला होता. त्यानंतर माझ्या सांगण्यावरूनच बाबर आझमची पाकिस्तानच्या कर्णधारपदावर निवड करण्यात आल्याचे देशाचे माजी प्रधानमंत्री आणि क्रिकेटपटू इम्रान खान यांनी म्हंटले आहे. इंग्लंडमध्ये २०१९ ला खेळविण्यात आलेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधार पदाची धुरा सर्फराझ अहमदच्या खांद्यावर होती. मात्र पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागल्याने त्याच्या जागी बाबरची निवड करण्यात आली होती.

या स्पर्धेतील सुरुवातीचे सामने बाबर आझमसाठी खूपच निराशाजनक होते, कारण तो मोठी धावसंख्या करू शकला नव्हता. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत फॉर्ममध्ये परतण्यासाठी त्याने सुरेख अर्धशतक झळकावले. पाकिस्तान विश्वचषक जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार्‍या अंतिम सामन्यात तिचा सामना इंग्लंडशी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

farmer Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीबाबत महायुती सरकारचा मोठा निर्णय! खुद्द फडणवीसांनीच केली घोषणा, म्हणाले...

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

IND vs AUS Semi Final: जेमिमा रॉड्रिग्जचे खणखणीत शतक! हरमनप्रीत कौरची हुकली सेंच्युरी, ऑस्ट्रेलियाला धडकी भरवणारी भागीदारी

India vs Pakistan अन् मोहसिन नक्वी पुन्हा 'राडा'! पुढील महिन्यात Asia Cup मध्ये हायव्होल्टेज सामना; जाणून घ्या डिटेल्स

SCROLL FOR NEXT