Virat-Kohli-Six 
क्रीडा

Virat Kohli: मीडिया-ट्रोलर्सने कोहलीवर खूप दबाव आणला, पण त्याने...; शास्त्रींचं विधान

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध नाबाद 82 धावा करून भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विराट कोहलीचे सर्वजण कौतुक करत आहे. आता या यादीत भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नावाचाही समावेश झाला आहे.

शास्त्री यांनी कोहलीचे केवळ कौतुकच केले नाही तर कोहलीवर टीका करणाऱ्यांनाही चोख प्रत्युत्तर दिले. रवी शास्त्री म्हणतात की, मीडिया आणि ट्रोल्सने विराट कोहलीवर खूप दबाव आणला, पण त्याने सगळ्यांना गप्प केले.

कोहलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या खेळीबद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणाले, ' विराटची सर्वोत्तम टी-20 खेळी पाहत असताना मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. मी फक्त त्याचीच वाट पाहत होतो. ऑस्ट्रेलियात हे घडणार हे मला माहीत होतं. विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियातील रेकॉर्ड तुम्ही पाहा. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या त्याला अनुकूल आहेत. त्याला ऑस्ट्रेलियाच्या मैदानांवर खेळायला आवडते. पाकिस्तानविरुद्धही कोहलीचा रेकॉर्ड खूप चांगला आहे, असंही शास्त्री म्हणाले.

रवी शास्त्री म्हणाले, 'भारत-पाकिस्तान सामना पाहण्याच्या माझ्या अनुभवातील, हरिस रौफच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांनी मारलेले षटकार सर्वोत्त होते. या षटकांराची तुलना २००३ मध्ये सचिनने शोएब अख्तरच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराशीच होऊ शकते. मात्र कोहलीने मारलेले दोन षटकार देखील दीर्घकाळ लक्षात राहतील, असंही शास्त्री यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT