ICC FTP 2023 - 2027 IPL and PSL Clash in 2025 Will Cost Pakistan Cricket Board Esakal
क्रीडा

ICC नं पाकिस्तानची केली गोची; IPL - PSL क्लॅशमुळे PCB ला होणार तोटा?

अनिरुद्ध संकपाळ

IPL ICC FTP Window PSL : बीसीसीआयने आयसीसी FTP मध्ये आयपीएलसाठी प्रत्येक वर्षी अडीच महिन्यांची विंडो मिळवली आहे. ही विंडो 2023 पासूनच्या आयसीसी फ्युचर टूर प्लॅनिंगमध्ये मिळणार आहे. मात्र 2025 ला पाकिस्तान सुपर लीग आणि आयपीएल हे दोन्ही हंगाम क्लॅश होणार आहेत. त्यामुळे याचा पाकिस्तानला मोठा तोटा होण्याची शक्यता आहे. पीएसएल मध्ये मिळणाऱ्या पैशापेक्षा आयपीएलमध्ये मिळणारी रक्कम कित्येक पटीने जास्त असल्याने सहाजिकच विदेशी खेळाडू आयपीएलला प्राधान्य देण्याची शक्यता जास्त आहे. (ICC FTP 2023 - 2027 IPL and PSL Clash in 2025 Will Cost Pakistan Cricket Board)

बीसीसीआयला आयसीसीच्या फ्युचर टूर प्रोग्राममध्ये मार्च ते जून अशी अडीच महिन्यांची विंडो प्रत्येक वर्षी मिळणार आहे. तर पीसीबी पाकिस्तान सुपर लीग प्रत्येक वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात आयोजित करते. मात्र 2025 ला PSL चा हंगाम पाकिस्तानला मार्च ते मे या दरम्यान घ्यावा लागणार आहे. कारण पाकिस्तानला फेब्रुवारी महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करायची आहे. त्यामुळे मार्च ते मे या दरम्यान पाकिस्तानच्या PSL चा शेवट आणि भारताच्या IPL चे सुरूवातीचे दोन आठवडे क्लॅश होण्याची शक्यता आहे.

याबाबत पीसीबीचे सीईओ फैजल हसनैन यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले की, 'ज्यावेळी फ्युचर टूर प्रोग्राम 2023 - 2027 पूर्ण करण्यात आला. या भरगच्च कार्यक्रमात आम्ही परिस्थिती, गुणवत्ता आणि खेळाडूंचा वर्कलोड याला प्राधान्य दिले आहे. आम्ही तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये योग्य समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून हे तीनही फॉरमॅट योग्यरित्या सुरू राहतील.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT