ICC Test Ranking Rishabh Pant  esakal
क्रीडा

ICC Test Ranking Rishabh Pant : सहा महिन्यापासून संघाबाहेर तरी ऋषभ पंत वाचवतोय भारताची लाज

अनिरुद्ध संकपाळ

ICC Test Ranking Rishabh Pant : अ‍ॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना झाल्यानंतर आयसीसीने कसोटी रँकिंग प्रसिद्ध केली आहे. सामन्यात शतक ठोकणारा इंग्लंडचा जो रूट हा पहिल्या स्थानावर पोहचला आहे. तर मोठी खेळी करणाऱ्यात अपयशी ठरलेला ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन हा तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. विशेष म्हणजे भारताचे सध्या कसोटी संघात असलेला एकही फलंदाज टॉप 10 मध्ये नाही. मात्र सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या ऋषभ पंतने भारताची लाज राखली असून त्याने आपले टॉप 10 मधील स्थान अबाधित राखले आहे.

कसोटी फलंदाज रँकिंगमध्ये जो रूट अव्वल स्थानावर पोहचला आहे. त्याने 5 स्थानांची उसळी घेतली. त्याचे आता 887 रेटिंग पॉईंट झाले आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा केन विलियम्सन आहे. त्याने 2 स्थानांची सुधारणा करत दुसऱ्या स्थानावर उडी घेतली आहे. यापूर्वी अव्वल स्थानावर असलेल्या मार्नस लाबुशेनची घसरण झाली असून तो तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. याचबरोबर स्टीव्ह स्मिथ देखील चार स्थान घसरून सहाव्या स्थानावर पोहचला आहे.

ऋषभ पंत टॉप 10 मधील एकटा भारतीय

ऋषभ पंत अपघातानंतर झालेल्या दुखापतीतून अजून सावरलेला नाही. तो गेल्या सहा ते सात महिन्यापासून क्रिकेटच्या मैदानापासूनच दूर आहे. त्याचा 30 डिसेंबर रोजी अपघात झाला होता. या अपघातात त्याच्या गुडघ्याला आणि घोट्याला दुखापत झाली होती. तो सध्या एनसीएमध्ये रिहॅब करत आहेत.

जरी पंत क्रिकेटपासून दूर असला तरी त्याचा कसोटी रँकिंगमधील दबदबा गेल्या सहा महिन्यापासून तसाच आहे. तो 758 रेटिंग पॉईंट्स घेऊन दहाव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे तो कसोटी फलंदाजी रँकिंगमध्ये टॉप 10 मध्ये असलेला एकमेव भारतीय फलंदाज आहे. ऋषभ पंतनंतर रोहित शर्मा 12 व्या तर विराट कोहली 700 रेटिंग पाईंट्स घेत 14 व्या स्थानावर आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT