Women WC Final Aus vs Eng GS Laxmi  Sakal
क्रीडा

CWC : ...म्हणून ऑस्ट्रेलिया-इंग्लंड फायनल भारतीयांसाठी अभिमानाची

सकाळ डिजिटल टीम

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या आयसीसी महिला वर्ल्ड कप (ICC Cricket World Cup) स्पर्धेतील फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात फाईट रंगणार आहे. भारतीय महिला संघाचा प्रवास साखळी सामन्यातील लढतीत संपुष्टात आला असला तरी रविवारी ख्राइस्टचर्चच्या हॅग्ले ओव्हल मैदानात रंगणारा सामना भारतीयासांठी खास असाच आहे. फायनल लढतीत भारतीय जीएस लक्ष्मी रेफ्रीची भूमिका बजावताना दिसरणार आहेत. ही गोष्ट भारतीयासांठी अभिमानास्पद अशीच असेल. 53 वर्षीय लक्ष्मी या 2008-09 पासून मॅच रेफ्रीची भूमिका साकारत आहेत. त्यांनी आतापर्यंत महिला क्रिकेटमधील 18 वनडे आणि 25 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात रेफ्रीची भूमिका बजावली आहे. महिला क्रिकेटमध्ये त्यांना 5 वनडे आणि 16 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. आयसीसी एमिरेट्स पॅनलमध्ये सामील होणाऱ्या त्या पहिल्या महिला रेफ्री आहेत. (ICC Women WC Final Aus vs Eng GS Laxmi Named As Match Referee For Final)

जमशेदपुरमधून सुरु झाले क्रिकेट करियर

लक्ष्मी यांचा जन्म 23 मे 1968 मध्ये आंध्र प्रदेशमधील राजमुंदरी येथे झाला. त्यांचे वडील टाटा मोटर्समध्ये कार्यरत होते. त्यामुळे जमशेदपुरमध्ये त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. इथेच त्यांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. 1986 मध्ये दहावी बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण न मिळाल्याने जमशेदपुर महिला कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. दक्षिण मध्य रेल्वेत नोकरी मिळवल्यानंतर त्या 1989 मध्ये हैदराबादला वास्तव्यास गेल्या. त्यानंतर त्यांनी दक्षिण मध्य रेल्वेकडून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

इंग्लंड दौऱ्यासाठी सिलेक्शन

लक्ष्मी यांनी 1989 आणि 2004 मध्ये आंध्र महिला, बिहार, रेल्वे, ईस्ट झोन आणि साउथ झोन महिला संघासह अनेक देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला. लक्ष्मी यांचा 1991 मध्ये विवाह झाला. लग्नाच्या दिवशीच शेष भारत संघाकडून खेळण्यासाठी त्यांना बोलवण्यात आले होते. पण त्यांनी क्रिकेटपासून विश्रांती घेण्याचा निर्णय़ घेतला.

लग्नानंतर दक्षिण मध्य रेल्वेकडून त्या पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरल्या. 1995 मध्ये त्यांनी इंटर-रेल्वे स्पर्धा जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. 1999 मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली. पण त्यांना एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. लक्ष्मी यांनी 2004 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT