If India Defeat West Indies In 2nd ODI Will Left Behind Pakistan In Most Series Win Against One Team List  esakal
क्रीडा

WI vs IND : टीम इंडियाने विंडीजचा पराभव केला तर पाकला लागणार मिरची

अनिरुद्ध संकपाळ

पोर्ट ऑफ स्पेन : भारत आणि वेस्ट इंडीज (West Indies Vs India) यांच्यातील तीन वनडे सामन्यातील दुसरा वनडे (2nd ODI) सामना आज (दि. 24 जुलै) त्रिनिदाद येथे खेळला जात आहे. भारताने पहिला वनडे सामना 3 धावांनी जिंकून मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकून भारताला आपला मालिका विजय निश्चित करण्याची चांगली संधी आहे. याचबरोबर भारताच्या या मालिका विजयामुळे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान (Pakistan) एका खास विक्रमाच्या यादीत मागे पडणार आहे.

या यादीत पाक भारताबरोबर टॉपर

जागतिक क्रिकेटमध्ये एका संघाविरूद्ध सर्वाधिक द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा विक्रम हा भारत आणि पाकिस्तान यांच्या नावावर संयुक्तरित्या आहे. भारताने वेस्ट इंडीजविरूद्धच्या सलग 11 मालिका जिंकल्या आहेत. भारताने 2007 नंतर ही कामगिरी केली आहे. तर पाकिस्तानने झिम्बावेविरूद्ध सलग 11 मालिका जिंकल्या आहेत. जर आज भारत विंडीज विरूद्धचा दुसरा सामना जिंकतो तर भारत या यादीत पाकिस्तानला मागे टाकू शकतो.

एका देशाविरूद्ध सर्वाधिकवेळा मालिका जिंकलेले देश (Most Series Win Against One Team)

भारत Vs वेस्टइंडीज 11* 2007 पासून आतापर्यंत

पाकिस्तान Vs जिम्बाब्वे 11* 1996 पासून आतापर्यंत

पाकिस्तान Vs वेस्टइंडीज 10* 1999 पासून आतापर्यंत

दक्षिण अफ्रीका Vs झिम्बावे 9* 1995 पासून आतापर्यंत

भारत Vs श्रीलंका 9* 2007 पासून आतापर्यंत

2006 साली मिळाला होता पराभवाचा मोठा धक्का

भारतीय संघ ज्यावेळी 2006 ला वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेला होता त्यावेळी तेथे पाच वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. पहिल्या सामन्यात भारताने 5 विकेट्स राखून विजय मिळवला. मात्र दुसरा सामना भारताने 1 धावेने गमावला. भारताला विजयासाठी एका चेंडूत दोन धावांची गरज होती आणि ड्वेन ब्राव्होने युवराज सिंगचा त्रिफळा उडवला होता. यानंतर भारत तीनही सामने हरला. वेस्ट इंडीजने ही मालिका 4 -1 अशी जिंकली होती. यानंतर भारत वेस्ट इंडीजकडून वनडे मालिकेत एकदाही पराभूत झालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT