IND vs AUS 1st odi Australia 188 all out Mohammed Shami and Mohammed Siraj pick three wickets each cricket news in marathi kgm00 
क्रीडा

IND vs AUS : आधी मार्शचा तांडव... नंतर भारतीय गोलंदाजांनी केली 35 षटकातच कांगारुंची शिकार

भारतीय गोलंदाजांनी दिवसा दाखवले ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तारे

Kiran Mahanavar

India vs Australia 1st ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार आजपासून रंगणार आहे. पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आधी मार्शचा तांडव... नंतर भारतीय गोलंदाजांनी केली 35 षटकातच कांगारुंची शिकार... कांगारूंचा संघ 35.4 षटकांत 188 धावांत गारद झाला आणि भारतासमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवले

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ट्रॅव्हिस हेड पाच धावा करून सिराजचा बळी ठरला. यानंतर मिचेल मार्श आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. स्मिथला हार्दिक पांड्याने यष्टिरक्षक केएल राहुलच्या हाती झेलबाद केले. त्याला 22 धावा करता आल्या.

यानंतर मार्शने लबुशेनसोबत तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. मार्शला जडेजाने सिराजच्या हाती झेलबाद केले. तो 65 चेंडूत 10 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 81 धावांची धडाकेबाज खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

मार्श बाद होताच संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघ कोसळला. लबुशेनला कुलदीपने जडेजाच्या हाती झेलबाद केले. त्याला 15 धावा करता आल्या. यानंतर मोहम्मद शमीचा कहर पाहायला मिळाला. त्याने तीन षटकांत तीन विकेट घेतल्या.

डावाच्या 28व्या षटकात जोस इंग्लिसला बाद केल्यानंतर शमीने 30व्या षटकात कॅमेरून ग्रीनलाही क्लीन बोल्ड केले. इंग्लिश 26 तर ग्रीनला 12 धावा करता आल्या. 30 व्या षटकात शमीला आणखी एक विकेट घेण्याची संधी होती, परंतु शुभमन गिलने स्लिपमध्ये मार्कस स्टॉइनिसचा झेल सोडला. मात्र, स्टॉइनिसला फारसा फायदा करता आला नाही आणि 32व्या षटकात शमीने त्याला स्लिपमध्ये शुभमनच्या हाती झेलबाद केले.

जडेजाने मॅक्सवेलला हार्दिककडे झेलबाद केले. मॅक्सवेलला आठ धावा करता आल्या. त्याचवेळी सिराजने शॉन अॅबॉट आणि अॅडम झम्पा यांना बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव 188 धावांत गुंडाळला.

शमी आणि सिराजने प्रत्येकी तीन, तर जडेजाने दोन विकेट घेतल्या. हार्दिक आणि कुलदीपने प्रत्येकी एक विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT