ind vs aus-1st-test-playing 11 captain Rohit Sharma 
क्रीडा

IND vs AUS: टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मधून कर्णधार रोहित 'या' खेळाडूचा पत्ता करणार कट

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग 11 मध्ये घेणार अनेक मोठे निर्णय!

Kiran Mahanavar

India vs Australia 1st Test Playing-11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता खेळल्या जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग 11 निवडण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेऊ शकतो. मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या एका खेळाडूला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणे खूप कठीण जात आहे. या खेळाडूची अलीकडची कामगिरीही अत्यंत खराब राहिली आहे.

भारतीय निवड समितीने सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन आणि केएस भरत यांचा या संघात समावेश करण्यात आला आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत केएस भरतला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळण्याचा मोठा दावेदार मानला जात आहे. अशा परिस्थितीत इशान किशनला या सामन्यात खेळणे जवळपास अशक्य आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत टीम इंडिया या मालिकेत एका स्पेशलिस्ट यष्टीरक्षकासह मैदानात उतरणार आहे. भारताची टर्निंग पिच पाहता केएस भरत शर्यतीत आघाडीवर आहे. तो टीम इंडियाच्या कसोटी संघाचाही बराच काळ भाग आहे. केएस भरतची देशांतर्गत क्रिकेटमधील अलीकडची कामगिरीही प्रभावी ठरली आहे.

इशान किशन टीम इंडियाकडून टी-20 आणि वनडे फॉरमॅटमध्ये खेळला आहे, तर त्याला पहिल्यांदाच टेस्ट टीममध्ये स्थान मिळाले आहे. इशान किशनने टीम इंडियासाठी आतापर्यंत 13 वनडे आणि 27 टी-20 सामने खेळल्या आहेत. या एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 46.09 च्या सरासरीने 507 धावा केल्या आहेत, या दरम्यान त्याने 1 शतक आणि 1 द्विशतक देखील केले आहे. त्याचबरोबर त्याने टी-20 मध्ये 25.12 च्या सरासरीने 653 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी सामन्यांसाठी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

Gokul Election : ठरावाच्या हिशोबात म्हशीपेक्षा रेडकू मोठं, ‘गोकुळ’मध्ये ४८४४ सभासदांचे ५४३९ ठराव; एकाच्या नावावर ८

Jharkhand High Court Verdict : ऑफिसमधील चहा पावडर घरी नेली अन् १७ वर्षांची नोकरी गमावली; हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

WhatsAppवरून मोबाईल नंबर होणार गायब? पण 'युजरनेम फीचर'ला केंद्र सरकारचा ब्रेक; नेमका धोका काय?

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

SCROLL FOR NEXT