rishabh pant esakal
क्रीडा

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी ऋषभ पंतच्या 'या' पोस्टमुळे उडाली खळबळ

ऋषभ पंतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला अन्...

Kiran Mahanavar

Ind vs Aus 1st Test Rishabh Pant : टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. ऋषभ पंत कार अपघातात गंभीर जखमी झाला होता, आता त्याच्या प्रकृतीबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे. हे अपडेट ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी आनंदाच्या बातमीपेक्षा कमी नाही. खुद्द पंतने त्याच्या चाहत्यांना ही मोठी माहिती दिली आहे.

ऋषभ पंतने काल त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. ऋषभ पंतनेही या फोटोला भावनिक कॅप्शन देत लिहिले की, 'बाहेर बसून ताजी हवेत श्वास घेणे इतके चांगले वाटले हे कधीच कळले नव्हते. इनसाइड स्पोर्टच्या बातमीनुसार, हा फोटो ऋषभ पंतच्या घराचा असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 4 जानेवारीपासून त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ऋषभ पंत 30 डिसेंबरच्या सकाळी आपल्या आईला भेटण्यासाठी दिल्लीहून रुरकीला जात असताणा त्यांची कार दुभाजकाला धडकली. बांगलादेशचा दौरा आटोपून तो मायदेशी परतत होता. पंतला क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी 5-6 महिने लागु शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याच्यावर आणखी एक महिन्यानंतर शस्त्रक्रिया करावी लागेल. दुसरी शस्त्रक्रिया कधी होणार हे डॉक्टर ठरवतील.

ऋषभ पंतने 2022 मध्ये टीम इंडियासाठी एकूण 7 सामने खेळले होते. यादरम्यान त्याने 61.81 च्या सरासरीने 680 धावा केल्या. दुसरीकडे 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये 37.33 च्या सरासरीने 336 धावा केल्या होत्या. टी-20 बद्दल बोलायचे झाले तर या फॉरमॅटमध्ये त्याने गेल्या वर्षी 25 सामने खेळताना 21.41 च्या सरासरीने केवळ 364 धावा केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT