Vidarbha Cricket Association Stadium Jamtha lucky for team India 
क्रीडा

Ind vs Aus: जामठ्यात भारताचीच 'दादागिरी', सहापैकी चार कसोटींमध्ये बाजी अन्...

कसोटी असो वा वनडे किंवा मग टी२० सामना जामठा स्टेडियम भारतासाठी नेहमीच लकी...

सकाळ ऑनलाईन टीम

Ind vs Aus 1st Test : कसोटी असो वा वनडे किंवा मग टी२० सामना. विदर्भ क्रिकेट संघटनेचे जामठा स्टेडियम भारतासाठी नेहमीच ''लकी'' राहिले आहे. या स्टेडियमवर आतापर्यंत झालेल्या सहापैकी चार कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाने बाजी मारून आपली दादागिरी कायम ठेवली आहे.

बॉर्डर-गावसकर चषक क्रिकेट कसोटी मालिकेतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली महत्त्वपूर्ण लढत येत्या गुरुवारपासून जामठा स्टेडियमवर खेळली जाणार आहे. २००८ मध्ये बांधण्यात आलेल्या जामठा स्टेडियमचा आतापर्यंतचा इतिहास बघितल्यास येथे यजमान भारताचेच वर्चस्व राहिल्याचे दिसून येते.

या स्टेडियमवर २००८ पासून आतापर्यंत एकूण सहा कसोटी सामने खेळले गेले. यातील सर्वाधिक चार सामने भारताने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. तर एका लढतीत संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला. फेब्रुवारी २०१० मध्ये झालेला इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना अनिर्णित सुटला.

उल्लेखनीय म्हणजे, या मैदानावरील पहिल्याच कसोटी सामन्यात भारताने कांगारूंना १७२ धावांनी धूळ चारली होती. याआधी सलग दोन कसोटींमध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघांना पराभूत केल्याने, यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला विजयी हॅटट्रिकची संधी राहणार आहे. घरच्या मैदानावरील अनुकूल वातावरण व खेळाडूंचा फॉर्म लक्षात घेता भारतीय संघाला विजयापासून रोखणे कांगारुंना निश्चितच कठीण जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 विश्वचषक 2026 प्रसारणावरून गोंधळ; ICCचा मोठा खुलासा, JioStar करार मोडल्याच्या अफवा फेटाळल्या

UPSC Exam: ‘यूपीएससी’चा मोठा निर्णय! 'या' उमेदवारांना मिळणार सोयीनुसार परीक्षा केंद्र

Pune Marathon : मॅरेथॉन दिवशी विद्यापीठात वाहनबंधी; धावपटूंसाठी विशेष शटल बस व पार्किंगची स्वतंत्र सोय!

Santosh Deshmukh Case: मारहाणीचे २३ व्हिडीओ अन् संतोष देशमुखांच्या पत्नी कोर्टाबाहेर धावल्या; वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

Hadapsar Accident : पुणे–सोलापूर महामार्गावर भरधाव वाहनाची धडक; दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन बळी

SCROLL FOR NEXT