Virat Kohli loses an unboxed phone Nagpur Police Force  sakal
क्रीडा

IND vs AUS: नागपूर पोलीस दलात खळबळ! विराटचा मोबाईल हरवला की कुणी चोरला?

विराट कोहलीचा ‘अनबॉक्स’ मोबाईल गायब!

सकाळ ऑनलाईन टीम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करीत असलेला भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहलीला सामन्यापूर्वीच धक्का बसला. विराटचा महागडा नवीन मोबाईल अचानक गायब झाला. ही माहिती स्वतः विराटने ट्विटरवरून शेअर केली. यामुळे पोलिसही बुचकाळ्यात पडले आहेत. मात्र, या प्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार झाली नाही.

भारतीय खेळाडू मंगळवारी जामठा स्टेडियमवर सरावाला जाण्याच्या तयारीत असताना विराटला त्याचा मोबाईल गायब झाल्याचे लक्षात आले. त्याने लगेच ही बातमी ट्विटरवरून शेअर केली. ‘नथिंग बिट्स दी सॅड फिलिंग ऑफ लुझींग युअर न्यू फोन विदाऊट इव्हन अनबॉक्सिंग इट, हॅज एनीवन सीन इट?’ अशा आशयाचे ते ट्विट होते.

विराटचा नवाकोरा फोन हरवल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे संपूर्ण शहर पोलिस दलात एकच खळबळ उडाली. मात्र, याबाबत स्वत: कोहली किंवा संघ व्यवस्थापनाने अद्याप कोणतीही पोलिस तक्रार केलेली नाही. त्यामुळे याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. ‘या ट्विटची आम्ही चौकशी केली. सहसा क्रिकेटपटूंचे लायझनिंग अधिकारी खेळाडूंच्या सुरक्षाव्यवस्थेत काही अडचणी निर्माण झाल्यास आम्हाला माहिती देतात.

आम्ही यासंदर्भात त्यांच्याकडे विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडून दुजोरा मिळाला नाही. तसेच विराटकडूनही फोन हरविल्याबाबतची लेखी अथवा तोंडी तक्रार आम्हाला प्राप्त झाली नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. विराटचा मोबाईल हरवला की कुणी चोरला, हेही कळू शकले नाही. उल्लेखनीय म्हणजे, काही वर्षांपूर्वी उत्तरप्रदेशचा रणजीपटू प्रवीण कुमारची तब्बल साडेसात लाख रुपये किंमतीची सोन्याची चेन जुन्या व्हीसीए मैदानावरून चोरट्याने लंपास केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT