ind vs aus 3rd odi rohit sharma- 
क्रीडा

IND vs AUS: कुलदीपने जबरदस्तीने घेतला DRS, संतापलेल्या रोहित शर्माने केली शिवीगाळ, पाहा व्हिडिओ

कुलदीप यादवच्या सांगण्यावरून रोहित शर्माने घेतला DRS अन् मग...

Kiran Mahanavar

Ind vs Aus 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे मालिकेतील तिसरा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 270 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने या सामन्यात शानदार गोलंदाजी केली.

कुलदीप यादवने 10 षटकांच्या कोट्यात एका मेडनसह 56 धावा दिल्या आणि 3 विकेट घेतल्या. त्याने डेव्हिड वॉर्नर, मार्नस लॅबुशेन आणि अॅलेक्स कॅरी यांना आपला बळी बनवले. मात्र यादरम्यान त्याने असे काही केले की कॅप्टन रोहित शर्माने त्याला शिवीगाळ केली. कुलदीप यादवने 39व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अॅलेक्स कॅरीला बॉलिंग करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

अॅलेक्स कॅरी बाद झाल्यानंतर अॅश्टन अगर क्रीझवर फलंदाजीला आला. पुढचे 4 चेंडू त्याने डॉट्स टाकले आणि शेवटचा चेंडू आगरच्या पुढच्या पॅडला लागला. अपील करण्यात आले पण पंचांनी ते फेटाळले. यानंतर कुलदीपने रोहितला डीआरएस घेण्यास भाग पाडले. मात्र चेंडू प्रभावाच्या बाहेर असल्याचे डीआरएसवरून स्पष्ट झाले.

भारताने रिव्ह्यू गमावला आणि त्यानंतर रोहित शर्मा कुलदीपला शिवीगाळ करताना दिसला. कुलदीपने हे ओव्हर मेडन टाकले. या सामन्यासाठी भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आणि ऑस्ट्रेलियन संघात दोन बदल केले. त्याने नॅथन एलिसच्या जागी अॅश्टन आगरला संघात स्थान दिले. त्याचवेळी कॅमेरून ग्रीनच्या जागी डेव्हिड वॉर्नर प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Solapur News: सोलापूर काँग्रेसच्या मातृसत्ता हरपली! माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन

Uddhav Nimse : राहुल धोत्रे खून प्रकरण: २५ दिवसांनंतर उद्धव निमसे अखेर पोलिसांच्या ताब्यात

Sangli Fake IT Raid Case: 'स्पेशल 26' चित्रपटाप्रमाणे डॉक्टरच्या घरावर आयकर छापा, सोने व रोकड लंपास | Sakal News

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

SCROLL FOR NEXT