IND vs AUS 3rd T20I Hyderabad Rain Can Spoil The Play What Is Weather Forecast During Match  esakal
क्रीडा

IND vs AUS 3rd T20I : निर्णायक सामन्यावर फिरणार पाणी; हैदराबादमध्येही पावसाची शक्यता?

अनिरुद्ध संकपाळ

IND vs AUS 3rd T20I Hyderabad Weather Forecast : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज (दि. 25) हैदराबाद येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकल्यामुळे मालिका 1 - 1 अशी बरोबरीत आहे. आजच्या सामन्यात मालिकेचा विजेता कोण याचा निर्णय होणार आहे. नागपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात पावसामुळे खेळ प्रत्येकी 8 षटकांचा झाला होता. आजच्या सामन्यातही पावसाची भुमिका फार महत्वाची असणार आहे.

हैदराबादचं हवामान काय म्हणतंय?

हैदराबादमध्ये आज थांबून थांबून पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण देखील असणार आहे. सामना रात्री 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत सुरू असणार आहे. या काळात ढगाळ वातावरण थोडंस निवळेल. या काळात पावसाची शक्यता 15 ते 17 टक्के इतकी आहे. सामना सुरू असताना तापमान अंदाजे 25 डिग्री सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. यामुळे सामना वेळावर सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच संपूर्ण 20 षटकांचा सामना देखील होईल असा अंदाज आहे. फक्त नागपूरसारखं मैदान ओलं राहिलं तर यात बदल देखील होऊ शकतो.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर आतापर्यंत फक्त दोनच आंतरराष्ट्रीय टी 20 सामने झाले आहेत. पहिला सामना 2017 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार होता. मात्र पावसामुळे सामना होऊ शकला नव्हता. तर 2019 मध्ये भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात टी 20 सामना झाला होता. भारताने हा सामना 6 विकेट्सनी जिंकला होता. वेस्ट इंडीजने 207 धावा केल्या होत्या. भारताकडून विराट कोहलीने 50 चेंडूत 84 धावा ठोकल्या. त्यामुळे भारताने 207 धावांचे लक्ष्य 8 चेंडू राखून पार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT