India vs Australia Test Series 
क्रीडा

IND vs AUS: बॉर्डर गावसकर ट्रॉफी सामन्याच्या मैदानात अचानक बदल! काय आहे कारण

Kiran Mahanavar

India vs Australia Test Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जात आहे. या सामन्यात टीम इंडियाची पकड मजबूत दिसत आहे. या सगळ्या दरम्यान या मालिकेशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार मालिकेतील तिसर्‍या कसोटी सामनाच्या ठिकाणात बदल होऊ शकतो.

दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. हा सामना 17 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. तिसरी कसोटी धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर 1 ते 5 मार्च दरम्यान होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या सामन्याचे ठिकाण बदलले जाऊ शकते. या मैदानावरील शेवटचा कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2017 मध्ये खेळला गेला होता.

नुकतेच एचपीसीए स्टेडियमच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले, त्यानंतर हे स्टेडियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आयोजन करण्यास योग्य होऊ शकले नाही. बीसीसीआय बोर्डाच्या तज्ज्ञांच्या टीमने मैदानाच्या पाहणीच्या निकालाच्या आधारे पुढील काही दिवसांत अंतिम निर्णय घेईल. असे कळते की बीसीसीआयने आधीच बॅक-अप ठिकाण निवडले आहे, परंतु धर्मशाला नाकारल्यासच त्याची घोषणा केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT