ind vs aus 3rd test Ravindra Jadeja rohit sharma in team india cricket news in marathi  
क्रीडा

IND vs AUS : 'जडेजा गोलंदाजी करताना कधी कधी कप्तान म्हणून मला...' रोहित काय बोलला

गेल्या दोन सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघातील फलंदाज भारतीय फिरकीला खेळताना गांगरून गेले

सकाळ ऑनलाईन टीम

India vs Australia 3rd Test : गेल्या दोन सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघातील फलंदाज भारतीय फिरकीला खेळताना गांगरून गेले, ज्याला अश्विन आणि जडेजाची अचूक गोलंदाजी कारण होती, तसेच त्यांच्या फलंदाजांना विचार करायला वेळच मिळत नव्हता हे कारणसुद्धा होते, असे मत भारतीय कर्णधार रोहितने तिसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले.

यासंदर्भात अधिक स्पष्टपणे बोलताना रोहित म्हणाला, खास करून जडेजा गोलंदाजी करताना खूप कमी पावले पळत येतो. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर त्याला जास्त फटके मारता येत नसल्याने जडेजाचे षटक बघता बघता संपते. फलंदाजाला दोन चेंडूंदरम्यान क्षणभरही विश्रांती घेता येत नाही इतका तो पटापट चेंडू टाकतो. कप्तान म्हणून कधी कधी मला त्याचा हा वेग झेपत नाही, कारण मला क्षेत्ररक्षणात काही बदल करायला तो वेळच देत नाही.

भारतीय संघातील प्रमुख फलंदाजांकडून अपेक्षित धावा जमा झालेल्या नाहीत. फलंदाजी करायला गेल्या दोन कसोटी सामन्यांतील खेळपट्ट्या सोप्या नव्हत्या. तरीही कसेही करून आम्हाला चांगली धावसंख्या उभारून देण्याचे काम पूर्ण करावे लागेल. दोन वेळा जडेजा, अश्विन आणि अक्षर पटेलने संघाला गरज असताना सुंदर फलंदाजी केली. जडेजा आणि अक्षर त्यांच्या रणजी संघासाठी खूप वरच्या क्रमांकावर फलंदाजी करतात, कारण ते चांगले फलंदाज आहेत. पहिल्या डावात चांगला खेळ करून धावा फलकावर लावता आल्या तर मोठे काम होऊन जाईल, असे रोहितने सांगितले.

सुट्टीचा असाही उपयोग

  • सतत क्रिकेट खेळणे सुरू असल्याने दिल्ली कसोटीनंतर हाती लागलेली सुट्टी मोलाची ठरली आहे. आमचा सहकारी शार्दुल ठाकूरच्या लग्नात सहभागी होता आले, याचा आनंद आहे.

  • बरेच खेळाडू घरी जाऊन विश्रांती घेऊन ताजेतवाने होऊन उत्साहाने इंदूरला आले आहेत. गेले दोन दिवस सरावासोबत आम्ही कसे इंदूर कसोटी सामन्याला सामोरे जाणार याची चर्चा केली आहे.

  • थोडक्यात सांगायचे तर भारतीय संघ तयारी करून तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे, असे भारतीय कर्णधार म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT