ind vs aus 4th test Mohammed Shami-will-return-in-ahmedabad-india-will-have-to-win-the-last-match-to-reach-wtc-final  
क्रीडा

IND vs AUS : शमी परतणार! WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला शेवटची संधी

अहमदाबाद कसोटीमध्ये शमी पुनरागमन करणार?

Kiran Mahanavar

Ind vs Aus 4th Test : भारताचा अनुभवी जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी अहमदाबाद येथील चौथ्या आणि अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात पुनरागमन करायची शक्यता आहे. शमी नागपूर आणि नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळला होता. मात्र जसप्रीत बुमराला दुखापत झाल्याने आणि शमी हा सुद्धा भारताचा प्रमुख गोलंदाज असल्याने त्याला तिसऱ्या लढतीसाठी विश्रांती देण्यात आली होती. शमीच्या जागी इंदूर येथे खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या सामन्यात उमेश यादवने गोलंदाजी केली होती.

अहमदाबाद येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याची खेळपट्टी ही फिरकीला जास्त अनुकूल न राहता ती जलदगती गोलंदाजालाही साह्य करणारी असू शकते, त्याकरता रिव्हर्स स्विंग करणाऱ्या मोहम्मद शमीला अंतिम ११ जणांमध्ये स्थान दिले जाऊ शकते; तर पहिल्या तिन्ही कसोटी सामन्यांत खेळलेल्या मोहम्मद सिराजला विश्रांती दिली जाऊ शकते. मोहम्मद शमीने यंदाच्या बॉर्डर-गावसकर करंडकामध्ये दोन लढतींमध्ये १४.४३ च्या सरासरीने ऑस्ट्रेलियाचे सात फलंदाज बाद केले आहेत.

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी थेट पात्र होण्यासाठी त्यांना हा सामना जिंकावा लागेल.

जलदगती गोलंदाजांचा समतोल

यंदाची बॉर्डर-गावसकर स्पर्धा सुरू होण्याअगोदर भारतीय संघ व्यवस्थापनाने डॉक्टरांच्या सल्ल्याने भारतीय संघातील जलदगती गोलंदाजांना आयपीएल स्पर्धा आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणारी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा ध्यानात ठेवत ब्रेक देण्याचे ठरवले आहे. या योजनेनुसार शमीला तिसऱ्या, तर सिराजला चौथ्या सामन्यात विश्रांती देण्यात येईल, असे ही मालिका सुरू होण्याआगोदरच ठरले होते. शमी आणि सिराज या दोघांचीही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेकरिता भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे दोघांनाही एकदिवसीय मालिकेआधी थोडी विश्रांती मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Bans China Cars : इस्त्रायलमध्ये 'मेड इन चायना' वाहनांवर बंदी, ७०० कार जप्त; सरकारचा 'या' कारणामुळे मोठा निर्णय

अग्रलेख : चला उभारा शुभ्र शिडे ती..

जुबेर हंगरगेकरला आज पुन्हा न्यायालयात नेले जाणार! ‘वाहदते मुस्लिम- ए- हिंद’च्या सोलापुरातील पदाधिकाऱ्यास ‘ATS’ची नोटीस, कुंभारीजवळील शाळेतील कार्यक्रमाचे तेच होते आयोजक

फास्ट फूड ते फॅटी लिव्हर

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT