Ind vs Aus 5th T20  sakal
क्रीडा

IND vs AUS : पाचव्या टी-20 मध्ये भारताला अंपायर 'पावला'? विजयानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Kiran Mahanavar

Ind vs Aus 5th T20 : बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या टी-20 मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला.

भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग अखेरच्या षटकात 10 धावा वाचवत संघासाठी हिरो ठरला. पण सोशल मीडियावर लोक काही वेगळेच चर्चा सुरू आहेत. खरे तर लोक अंपायरलाच भारताच्या विजयाचा खरा हिरो म्हणत आहेत.

अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 10 धावांची गरज होती. ओव्हर केली डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने. पहिला चेंडूवर त्याने बाऊन्सरने टाखला, जो स्ट्राइकवर असलेला ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडच्या डोक्यावरून गेला, पण लेग अंपायरनेही तो वाइड दिला नाही. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मॅथ्यू वेड आऊट झाला आणि चौथ्या चेंडूवर 1 धाव आली.

आता ऑस्ट्रेलियाला 2 चेंडूत 9 धावांची गरज होती. स्ट्राईकवर असलेल्या नॅथन एलिसने सरळ शॉट खेळला, जो अर्शदीपच्या हाताला लागला आणि अंपायरला लागला आणि चेंडू तिथेच थांबला, फलंदाज फक्त 1 धाव घेऊ शकला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला 1 चेंडूत 8 धावा करायच्या होत्या आणि अर्शदीपने शेवटच्या चेंडूवर केवळ 1 धाव खर्च करून भारताला विजय मिळवून दिला.

शेवटच्या षटकात अंपायरसोबत झालेल्या घटनेनंतर एका यूजरने अंपायरबद्दल लिहिले, अंपायर छान फिल्डिंग. याशिवाय इतर लोकांनी प्रतिक्रिया देताना लिहिले की, अंपायरने बाऊंड्री वाचवली. त्याचप्रमाणे चाहत्यांनी अंपायरवर प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांना भारताच्या विजयाचा नायक म्हटले.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 8 गडी गमावून 160 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला 20 षटकांत 8 बाद 154 धावांपर्यंतच मजल मारता आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

K Annamalai: 'मी मुंबईत येणार, हिंम्मत असेल तर पाय कापा'! के. अन्नामलाईंचे राज ठाकरेंना थेट आव्हान; महाराष्ट्रात वातावरण तापलं

Dhule Municipal Election : दोन बिनविरोध अन्‌ दोन जागांसाठी ‘काटा लढत’ श्रमिक, कष्टकऱ्यांच्या प्रभागात अभ्यासू अभियंता, व्यावसायिक, महाराज मैदानात

Golden Global Awards : प्रियंकाला पाहून निक जोनासची नजरच हटेना , गोल्डन ग्लोब अवॉर्डमधील व्हिडिओ व्हायरल

Ichalkaranji Election : ६५ जागांचे स्वप्न अपूर्ण; ११ उमेदवारांवरच परिवर्तन आघाडीची इचलकरंजीत कसोटी

Latest Marathi News Live Update : बाणेरमध्ये सिमेंट मिक्सरच्या धडकेत बांधकाम मजुराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT