Matthew Hayden IND vs AUS 3rd Test  esakal
क्रीडा

IND vs AUS 3rd Test : 2004 च्या कसोटी मालिकेत भारताला रडवणारा फलंदाज करणार गटांगळ्या खाणाऱ्या कांगारूंना मदत

अनिरुद्ध संकपाळ

Matthew Hayden IND vs AUS 3rd Test : भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या दोन्ही कसोटीत सपशेल नांग्या टाकल्या. ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा भारताच्या फिरकीपुढे निभावच लागत नव्हता. पहिल्या दोन्ही कसोटी अडीच दिवसातच संपुष्टात आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघावर आजी माजी खेळाडूंसह मायदेशातील माध्यमेही बोचरी टीका करत आहेत.

यादरम्यानच, अडचणीत सापडलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी माजी फलंदाज आखाड्यात उतरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनला ऑस्ट्रेलियाच्या संघाची मदत करण्यासाठी विचारणा झाली आहे.

गेल्या दोन कसोटी सामन्यातील एकूण 40 विकेट्सपौकी 32 विकेट्स या फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी घेतल्या आहेत. हेडन सध्या स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करत आहेत. त्याने ऑस्ट्रेलियन संघाची मदत करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.

हेडन सिडनी मॉर्निंग हेराल्डशी बोलताना म्हणाला की, 'हो मी ऑस्ट्रेलियन संघाला शंभर टक्के मदत करणार, कोणत्याही वेळी, कोणत्याही दिवशी किंवा रात्री मी त्यांना माझा अनुभव शेअर करणार. मी यासाठी शंभर टक्के तयार आहे.' हेडन पुढे म्हणाला की, 'मला कोणीही कधीही काही करायला सांगितले तर मी त्याला कायम होकारच देतो.'

ऑस्ट्रेलियाचा माती कर्णधार मायकल क्लार्कने संघ व्यवस्थापनाने हेडनचा मुल्यवान सल्ला घ्यावा अशी मागणी केली होती. हेडनने 2001 च्या भारत दौऱ्यावर 110 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. त्यानंतर गिलख्रिस्टच्या नेतृत्वात 2004 मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघात देखील त्याचा समावेश होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने भारतात 1969 नंतर पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती.

(Sports Latest News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT