india-vs-australia-1st-odi 
क्रीडा

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया ODI थरार होणार सुरू! केव्हा, कधी अन् कुठे पाहाणार मॅच, घ्या जाणून

Kiran Mahanavar

India vs Australia 1st ODI Live Streaming : भारत दौऱ्यावर असलेला ऑस्ट्रेलिया संघ कसोटी नंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ही मालिका 17 मार्चपासून सुरू होणार असून पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांचे नियमित कर्णधार उपस्थित राहणार नाहीत. वानखेडेवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या टीम इंडियाची धुरा सांभाळणार आहे, तर पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद सांभाळणार आहे.

पहिला सामना कधी आणि कुठे होणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 17 मार्च शुक्रवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल.

तुम्ही सामना थेट कुठे आणि कसा पाहू शकाल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे केले जाणार आहे. त्याच वेळी डिस्ने प्लस हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटद्वारे सामन्याचे थेट प्रसारण केले जाईल.

भारत-ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय सामन्यांचा विक्रम

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 143 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 80 विजयांसह आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने आतापर्यंत एकूण 53 सामने जिंकले आहेत. यामध्ये 10 सामने अनिर्णित राहिले आहेत. या दोघांमध्ये ऑस्ट्रेलियाने 389 धावांची सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.

टीप- पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या भारतीचे कर्णधार असेल.

एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ - स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT