ind vs aus odi rohit-sharma-lead-team-india-lost-first-position- 
क्रीडा

IND vs AUS ODI: कसोटीत नंबर 1 बनण्याच्या नादात झाले मोठे नुकसान! ऑस्ट्रेलियाचा भारताला मोठा धक्का

Team India News: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

Kiran Mahanavar

Ind vs Aus ODI : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिली वनडे जिंकल्यानंतर उरलेल्या दोन वनडेत भारताचा पराभव झाला. या पराभवामुळे भारताचे वनडे क्रमवारीतील पहिले स्थानही गमवावे लागले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया एक पायरीवर आला आहे. कसोटी मालिकेत दणदणीत विजय नोंदवल्यानंतर टीम इंडियाला वनडेत लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. (Latest Sport News)

ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर आला तेव्हा भारतीय संघाच्या नजरा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याकडे होत्या. हे करण्यात भारताला यश आले पण हे साध्य करण्याच्या प्रक्रियेत त्यांना वनडे क्रमवारीतील पहिले स्थान गमवावे लागले. (Latest Marathi News)

या मालिकेपूर्वी भारताचे 114 रेटिंग होते आणि ऑस्ट्रेलियाचे 112 रेटिंग होते. मात्र मालिका गमावल्यानंतर त्यात बदल झाला. दोन्ही संघांचे 113 रेटिंग आहेत. पण कमी सामने खेळल्यामुळे ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे.

भारताला हा सामना जिंकता आला असता. मात्र खराब फलंदाजीमुळे त्याला पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाचा फक्त एक खेळाडू 50चा आकडा पार करू शकला.

पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा बाद झाला. रोहित शर्मा किंवा शुभमन गिल यांनीही विशेष काही केले नाही. याचा परिणाम असा झाला की भारताने हा सामना 21 धावांनी गमावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपने बाहेरून लोक का घेतले? निष्ठावंतांना डावललं का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं सविस्तर उत्तर

Arjun Tendulkar: अर्जुनचा भेदक मारा, पृथ्वी शॉ याला गंडवले; वासुकी कौशिकसह महाराष्ट्राचे ५ फलंदाज २५ धावांत तंबूत पाठवले

Fake Liquor Bottles : भेसळ इंग्लिश नजराणा! नामांकित ब्रँडची दारू विक्री, घरातच काढला कारखानाच; ऐन निवडणुकीत मोठी कारवाई

Latest Maharashtra News Updates : गुंड गजा मारणेला पत्नीचा प्रचार करण्यास बंदी

Mahesh Manjrekar: “मुंबईकर म्हणून लाज वाटते…” महेश मांजरेकरांच्या एका वाक्याने खळबळ, म्हणाले "आता विकास नको!"

SCROLL FOR NEXT