ind vs aus odi suryakumar yadav Golden duck in 2 matches Out of third ODI
ind vs aus odi suryakumar yadav Golden duck in 2 matches Out of third ODI 
क्रीडा

IND vs AUS : सुर्या भाऊ सलग 2 सामन्यात गोल्डन डक; तिसऱ्या वनडेतून बाहेर?

Kiran Mahanavar

Ind vs Aus ODI Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव हा टी-20 मध्‍ये नंबर वन फलंदाज असूनही तो आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये प्रभाव पाडण्‍यात अपयशी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या मायदेशातील वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला खातेही उघडता आले नाही.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही वनडेत पहिल्याच चेंडूवर सूर्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सूर्याला एकदिवसीय सामन्यांमध्ये मर्यादित संधी मिळाल्या आहेत पण त्याचा फायदा उठवण्यात तो आतापर्यंत अपयशी ठरला आहे. पुढच्या सामन्यात सूर्यकुमारच्या स्थानाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. असे असतानाही भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने सूर्याला पाठिंबा दिला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना बुधवारी चेन्नई येथे होणार आहे. अजय जडेजा म्हणतो की, वरील कामगिरीनंतरही सूर्याला चेन्नई वनडेत संधी मिळाली नाही तर त्याला आश्चर्य वाटेल. एकूणच सूर्याला चेन्नईतही संधी द्यावी, अशी जडेजाची इच्छा आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये सूर्यकुमार यादवने शेवटचे अर्धशतक झळकावले होते. तेव्हापासून तो 16 सामने खेळला आहे. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 34 आहे, जी त्याने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध केली होती.

क्रिकबझ शोमध्ये, जेव्हा अजय जडेजाला विचारण्यात आले की, पुढील एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमारची जागा घेऊ शकेल असा सध्या कोणी खेळाडू आहे का? यावर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू म्हणाला, 'जेव्हा बेंच स्ट्रेंथचा खेळाडू संघात येण्यासाठी दरवाजा ठोठावत असेल तेव्हा सूर्यकुमारला संघातून वगळण्याचा विचार केला जाऊ शकतो. सर्व खेळाडू येथे बसले आहेत.

सूर्यकुमार यादवने 22 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2 अर्धशतकांच्या मदतीने 433 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 25.47 इतकी आहे. 18 जुलै 2021 रोजी श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवने पहिल्या सामन्यात नाबाद 31 धावा करून खूप प्रभावित केले.

दुसऱ्या वनडेत त्याने अर्धशतक ठोकले. जडेजा म्हणाला, 'सूर्यकुमारने स्वतःसाठी संघाचे दरवाजे उघडले आहेत. त्याला संघातून वगळण्याचा विचार असेल असे मला वाटत नाही. आणि तसे झाले तर मला आश्चर्य वाटेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT