Rahul Dravid sakal
क्रीडा

IND vs AUS: राहुल द्रविडची कोचिंग कारकीर्द धोक्यात! टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूने उठवला आवाज

राहुल द्रविडच्या जागी भारताचा T20I प्रशिक्षक म्हणून दिग्गज खेळाडूने सुचवली दोन नावे

Kiran Mahanavar

इंदूर कसोटीवर भारतीय संघाने यावेळी पूर्णपणे लक्ष केंद्रित केले आहे. टीम इंडियाचे सर्व खेळाडू तयारीत व्यस्त आहे, कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठणे हे या संघाचे एकमेव ध्येय आहे. भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीत विजयाची नोंद केली तर संघ WTC च्या अंतिम फेरीत जाईल. दरम्यान भारताच्या माजी दिग्गज क्रिकेटपटूने संघातील बदलाबाबत मोठी मागणी केली आहे. त्यामुळे राहुल द्रविडची कोचिंग कारकीर्द धोक्यात आली आहे.

माजी दिग्गज फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने भारतीय संघातील प्रशिक्षक बदलाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. जेव्हा संघात दोन कर्णधार असू शकतात तेव्हा दोन प्रशिक्षक असायला काय हरकत नाही, असे त्याने म्हटले आहे. टीम इंडियाचे दोन प्रशिक्षक असावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. कसोटी आणि वनडेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आहे तर हार्दिक पांड्या टी-20 मध्ये ही भूमिका बजावत आहे.

एका वृत्तसंस्थेच्या कार्यक्रमात हरभजन सिंग म्हणाला, जेव्हा तुमच्याकडे दोन कर्णधार असू शकतात, तर दोन प्रशिक्षक का नाही? ज्याचे नियोजन वेगळे असते. जसे इंग्लंडने ब्रेंडन मॅक्युलमसोबत केले आहे. वीरेंद्र सेहवाग किंवा आशिष नेहरा बरोबर तुम्हीही करू शकता. आशिष नेहराने गुजरात टायटन्ससोबत काम केले आणि हार्दिक पांड्याने कर्णधार म्हणून त्यांची पहिली स्पर्धा जिंकली. त्यामुळे टी-20 फॉरमॅट समजणाऱ्या आणि खेळाच्या मागण्या चांगल्या प्रकारे जाणणाऱ्या व्यक्तीला आणा.

पुढे बोलताना तो म्हणाला, समजा आशिष नेहरा हा टी-20 कोच असेल तर त्याला माहीत आहे की, त्याचे काम भारतीय संघाला टी-20 फॉर्मेटमध्ये चॅम्पियन बनवणे आहे आणि राहुल द्रविडला माहित आहे की भारतीय संघ कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही सामने जिंकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT