ind vs aus test rohit sharma 
क्रीडा

IND vs AUS: कर्णधार रोहित शर्मावर कसोटी क्रिकेटमध्ये अन्याय! दिग्गज खेळाडूंचा धक्कादायक खुलासा

कर्णधार रोहित शर्माने 120 धावांची संस्मरणीय खेळी खेळली पण...

सकाळ ऑनलाईन टीम

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने नागपूर कसोटी सामना अवघ्या तीन दिवसांत जिंकला. या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज विशेषत: रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने 120 धावांची संस्मरणीय खेळी खेळली.

नागपूर कसोटीत रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. टीम इंडियाचा सीनियर यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने रोहितचे जोरदार कौतुक केले आणि अन्याय होत असल्याचे पण सांगितलं.

रोहित हा तिन्ही फॉरमॅटचा सध्याचा जागतिक दर्जाचा फलंदाज आहे. दिनेश कार्तिकचे असे मत आहे. दिनेश कार्तिक क्रिकबझवर म्हणाला, रोहित शर्मा हा जागतिक दर्जाचा फलंदाज आहे यात शंका नाही. देशासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा तो सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. त्याने अलीकडेच कर्णधार म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावले. भारतात त्याने कसोटीत सलामीवीर म्हणून सुमारे 75च्या सरासरीने धावा केल्या आहेत. जेव्हापासून तो पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर बनला, तेव्हापासून त्याच्यासाठी परिस्थिती खूप लवकर बदलल्या.

मात्र दिनेश कार्तिकला वाटते की, रोहित शर्माचे कसोटी क्रिकेटमध्ये जेवढे कौतुक व्हायला हवे होते तेवढे झाले नाही. हा त्याच्यावर अन्याय आहे. तो म्हणाला, तुम्ही बघू शकता की त्याला फलंदाजी किती आवडते. तो आधी वेगवान गोलंदाजांना आणि नंतर फिरकीपटूंना टारगेट करतो. पण कधी-कधी मला असं वाटतं की, कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे कौतुक कमी झाले. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून त्याने चमकदार कामगिरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport : पुणे विमानतळ झेपावणार नव्या उंचीवर! विस्तारासाेठी केंद्राकडे प्रस्ताव; ३०० एकर जागेची आवश्यकता

Latest Marathi Breaking News : राज्यात आजपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी

Viral Video : रिलसाठी लाज सोडली, कारची काच खाली घेत तरुणीनं काढले कपडे; धक्कादायक व्हिडीओ समोर

Historical Sculpture Research: 'वेळापुरात छत्रपती शाहूंच्या दगडी शिल्पाचा शोध'; ऐतिहासिक ठेवा; इतिहास अभ्यासक अमर साळुंखे यांची कामगिरी..

टॅरिफला नावं ठेवणारे मूर्ख, टॅरिफमधून प्रत्येक अमेरिकी नागरिकाला २ हजार डॉलर देणार; ट्रम्प यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT