क्रीडा

IND vs AUS: BCCI कडून 'या' खेळाडूंवर अन्याय! देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करूनही बाहेर

Kiran Mahanavar

India vs Australia Test and ODI Series : देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक क्रिकेटपटूंनी सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या या क्रिकेटपटूंमध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांनी यापूर्वी भारताकडून कसोटी सामने खेळले आहेत. त्याचबरोबर काही नवे खेळाडूही टीम इंडियामध्ये बाजी मारण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी त्याच्या कामगिरीला सातत्याने दुर्लक्ष केले आहे.

मयंक अग्रवाल नुकत्याच संपलेल्या रणजी हंगामातील 2022-23 मध्ये सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. यादरम्यान त्याने 9 सामन्यांच्या 13 डावांमध्ये सर्वाधिक 990 धावा केल्या. रणजी ट्रॉफीच्या या मोसमातील त्याची सर्वोच्च धावसंख्या 249 धावा होती. जी त्याने सौराष्ट्रविरुद्धच्या उपांत्य सामन्यात केली होती. असे असतानाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.

सरफराज खान गेल्या अनेक सत्रांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. या वर्षीही त्याने मुंबईकडून खेळताना रणजी ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली. या मोसमात त्याने 6 सामन्यात 3 शतके झळकावत 556 धावा केल्या. रणजी ट्रॉफी 2022-23 मध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 162 धावा होती. असे असूनही त्याची भारतीय कसोटी संघात निवड झाली नाही.

संजू सॅमसनने देशांतर्गत क्रिकेटमध्येही आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या वर्षी त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीमध्ये चांगली फलंदाजी केली. सध्या टीम इंडियामध्ये असे काही क्रिकेटर्स आहेत ज्यांच्याकडून संजूची कामगिरी अधिक प्रभावी आहे. असे असूनही त्याला टीम इंडियात पुरेशी संधी दिली जात नाही. श्रीलंकेविरुद्धच्या मुंबई टी-20 सामन्यात दुखापत झाल्यानंतर तो अद्याप राष्ट्रीय संघात परतलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT