Ind vs Aus WTC Final 2023 skal
क्रीडा

WTC Final: ओव्हल कसोटीत येणार सर्वात मोठा ट्विस्ट, कांगारूंचे टेन्शन वाढणार!

Kiran Mahanavar

Ind vs Aus WTC Final 2023 : लंडनमधील ओव्हल क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना सुरू आहे. पहिल्या दोन दिवसांच्या खेळानंतरच कांगारू संघाने सामन्यावर आपली पकड घट्ट केली.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव 469 धावांवर संपला. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाची धावसंख्या पाच विकेट्सवर 151 धावा अशी झाली होती. या स्थितीत टीम इंडिया अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. पण जर भारतीय चाहत्यांनी सर्व आशा गमावल्या असतील तर त्यांनी धीर धरावा, कारण या कसोटीत अजून मोठा ट्विस्ट यायचा आहे.

आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. या दिवशी भारतीय संघाने 270 चा आकडा वाचवला तर फॉलोऑन वाचेल आणि कांगारू संघ दुसऱ्या डावात खेळेल. अन्यथा भारत फॉलोऑन करू शकतो किंवा ऑस्ट्रेलिया त्यांचा दुसरा डाव सुरू करू शकतो. पण आपण ज्या ट्विस्टबद्दल बोलत आहोत तो चौथ्या दिवसापासून येण्याची चिन्हे दिसत आहेत. एवढेच नाही तर तो ट्विस्ट आला तर शेवटचे दोन दिवसच नाही तर राखीव दिवसही धोक्यात येऊ शकतो.

जिथे भारतीय संघ दुस-या डावात करिष्माई फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर सामना फिरवू शकतो. त्याचबरोबर इंद्रदेवही टीम इंडियावर मेहरबानी करू शकतात. खरं तर लंडनच्या हवामानाचा अंदाज कांगारूंचे टेन्शन वाढणार आहे. शनिवार म्हणजे चौथा दिवस आणि रविवार म्हणजे पाचव्या दिवशी दिवसभर आणि संध्याकाळ UK मध्ये पावसाची 80 टक्क्यांहून अधिक शक्यता आहे.

शनिवारी दिवसभरात 79 टक्के आणि संध्याकाळी 55 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रविवारी येथे 88 टक्के पाऊस पडू शकतो. इतकेच नाही तर सोमवार, 12 जून हा दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला असून, त्या दिवशीही 88 टक्के पावसाचा अंदाज आहे. तीन दिवसांच्या खेळात व्यत्यय आला आणि सामना अनिर्णित राहिला, तर टीम इंडियाचा पराभव टळू शकतो. संघाने अद्याप सामना गमावला नसला तरी ऑस्ट्रेलियाने आपली पकड मजबूत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT