IND vs BAN 1st ODI India Fined 80% of Match Fee for Slow Over rate in One-wicket Loss to Bangladesh cricket news  
क्रीडा

IND vs BAN: भारतीय क्रिकेट संघासाठी दुष्काळात तेरावा महिना

बांगलादेशकडून पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का! काय आहे कारण

Kiran Mahanavar

India vs Bangladesh ODI : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळला गेला. हा रोमांचक सामना बांगलादेशने एका विकेटने जिंकला. या पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. ICC ने सोमवारी भारतीय क्रिकेट संघाला पहिल्या एकदिवसीय सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी त्यांच्या मॅच फीच्या 80 टक्के दंड ठोठावला आहेत.

आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे. मॅच रेफरी रंजन मदुगले यांना आढळले की टीम इंडियाने पहिल्या वनडेमध्ये निर्धारित वेळेपेक्षा चार षटके कमी टाकली आहेत. याच कारणामुळे टीम इंडियाला शिक्षा झाली आहे. आयसीसीने म्हटले की, नियम 2.22 नुसार, खेळाडूंना त्यांच्या संघाच्या निर्धारित वेळेत प्रत्येक षटकाच्या विलंबासाठी त्यांच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड आकारला जातो.

आयसीसीने सांगितले की कर्णधार रोहित शर्माने चूक मान्य केली असून प्रस्तावित शिक्षाही मान्य केली आहे. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज नव्हती. मैदानावरील पंच मायकेल गॉफ आणि तनवीर अहमद, तिसरे पंच शरफुडोला इब्ने शाहिद आणि चौथे पंच गाझी सोहेल यांनी हा आरोप लावला.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघ 41.2 षटकात 186 धावांवर गारद झाला. रोहित शर्माने 27, श्रेयस अय्यरने 24 आणि वॉशिंग्टन सुंदरने 19 धावा केल्या. याशिवाय शिखर धवनने सात आणि विराट कोहलीने नऊ धावा केल्या. शाहबाज अहमद आणि दीपक चहर यांना खातेही उघडता आले नाही. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने पाच आणि इबादत हुसेनने चार विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने 46 षटकांत नऊ गडी गमावून लक्ष्य गाठले. कर्णधार लिटन दासने 41 धावा केल्या. त्याचवेळी मेहदीने 38 धावांची नाबाद खेळी खेळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 3rd ODI: जैस्वालचं शतक अन् विराट-रोहितची फिफ्टी; भारताने दणदणीत विजयासह मालिकाही जिंकली

IND vs SA: यशस्वी जैस्वालने केलं संधीचं सोनं, वनडेत झळकावलं पहिलं वहिलं शतक; विराट, रोहितसारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान

Latest Marathi News Live Update : मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील थोडक्यात बचावले

Mumbai News: दहिसर-भाईंदर प्रवास फक्त ५ मिनिटांत! ४५ मीटर रुंदीचा एलिव्हेटेड रोड उभारणार; बीएमसीची मोठी घोषणा

Nanded Cylinder Blast : शेतकामासाठी कुटुंब शेतात आणि घरात सिलेंडरचा स्फोट; सात लाखाचे नुकसान; तडखेल येथील घटना!

SCROLL FOR NEXT